समुद्रात अडकलेले शेवटच्या टप्प्यातील खलाशी मजूर डहाणू किनाऱ्यावर दाखल

वाडा: कोराना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आणि लाॅकडाऊन परिस्थितीत गुजरातच्या समुद्री भागात अडकलेला पालघर जिल्ह्यातील डहाणू - तलासरी भागातील ७ ते ८ हजार खलाशी मजूर उतरविण्याचे काम गेले पाच दिवसांपासून

वाडा: कोराना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आणि लाॅकडाऊन परिस्थितीत गुजरातच्या समुद्री भागात अडकलेला पालघर जिल्ह्यातील डहाणू – तलासरी भागातील ७ ते ८ हजार खलाशी मजूर उतरविण्याचे काम गेले पाच दिवसांपासून सुरू आहे.यातील काही बोटीतील १०५ मजूर खलाशी हे डहाणू किनारी दाखल आहेत.त्यांच्या जेवणाची सोय डहाणूचे आमदार विनोद निकोले व त्याचे सहकारी कार्यकर्ते  गेले पाच दिवसापासून करीत आहेत.

या शेवटच्या बोटीतील खलाशी ही इथल्या प्रशासकीय यंञणेशी बोलून उतरविले जातील. आज सुट्टीचा दिवस आहे प्रांताधिकारी यांच्याशी संपर्क साधून व त्यांच्याशी विचार विनिमय करून आज किंवा उद्या उतरविले जाणार असल्याचे आमदार विनोद निकोले यांनी सांगितले.  लाॅकडाऊन काळात गुजरात राज्यातील मंगलोर, पोरबंदर,वेरावळ भागात पालघर भागातील खलाशी मजूर फसला होता.यावर या मतदारसंघाचे कम्युनिस्ट पक्षाचे आमदार  विनोद निकोले यांनी जिल्हाधिकारी कैलास शिंदे इतर प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन हा खलाश्यांच्या व्यवस्थेबाबत चर्चा झाली. मात्र तेथे काही व्यवस्था होऊ शकली नाही. परिणामी खलाशी मजुरांनी स्वतःचे पैसे खर्च करून भाड्यावर बोटी आणल्या. जवळजवळ ७ ते ८  हजार खलाशी मजूर डहाणू आणि तलासरी भागातून रोजगारासाठी जात असतात.ते आतापर्यंत डहाणू  व झाई या किनारा भागात उतरविण्यात आले. यात १०५ खलाशी मजूर आज दाखल झाले आहेत. पण आज सुट्टी असल्यामुळे त्यांना उद्या ११ वाजेपर्यंत उतरविण्यासाठी प्रांत आणि जिल्हाधिकारी यांना याविषयी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे, असेही आमदार निकोले यांनी यावेळी सांगितले. यात लोकप्रतिनिधींकडून व शासकीय यंञणेकडून सहकार्य  लाभले. यात येणाऱ्या प्रत्येक खलाशी मजुरांची जेवणाची व्यवस्था कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते मच्छिमार सोसायटीचे उपाध्यक्ष  जितू मर्दे, हरेश्र्वर आकरे, मयुर मर्दे  व इतर सामाजिक संस्था करत आहेत.