डहाणू किनारी ४५९ खलाशी कामगार दाखल

वाडा: पालघर जिल्ह्यातील डहाणू किनारी गुजरात राज्यात अडकलेले मजूर खलाशी आज उतरविण्यात आले. यावेळी डहाणू किनारी ४५९ खलाशी मजूर उतरविण्यात आले असून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती डहाणू

वाडा: पालघर जिल्ह्यातील डहाणू किनारी गुजरात राज्यात अडकलेले मजूर खलाशी आज उतरविण्यात आले. यावेळी डहाणू किनारी ४५९ खलाशी मजूर उतरविण्यात आले असून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती डहाणू तहसीलदार राहुल सारंग यांनी दिली.

देशात लॉकडाऊनच्या काळात गुजरात राज्यातील मेंगलोर, वेरावल, पोरबंदर भागात पालघर जिल्ह्यातील डहाणू,तलासरी भागातील मजूर खलाशी कामगार अडकले होते. ते येत असताना त्यांना उबर गाव येथे विरोध झाला आणि ते पुन्हा गुजरातच्या समुद्री भागात ते निघून गेले.त्यांनतर त्या खलाशांना आण्याची बैठक इथल्या लोकप्रतिनिधींनी जिल्हा प्रशासन विभाग यांच्या समवेत बैठक घेऊन आतापर्यंत डहाणू आणि झाई भागात पोलीस कर्मचारी,आरोग विभाग,महसुली विभाग,आणि लोकप्रिनिधींच्या उपस्थित १० हजारहून अधिक मजूर खलाशी कामगारांना उतरवून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले. डहाणुतील सेंट मेरी हायस्कूलमध्ये काही
दिवस ठेऊन त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येऊन त्यांना घरी पाठविण्यात येत होते. आज सकाळच्या सुमारास ६ बोटी या हे खलाशी मजूर कामगार दाखल झाले आहेत .यात ४५९ खलाशी मजूर कामगार उतरविण्यात आल्याची माहिती डहाणूच्या तहसीलदारांनी दिली. हे खलाशी डहाणू आणि तलासरी भागातील असून अजून काही कामगारांच्या बोटी येणे बाकी आहेत.