under construction

शहरातील मालमत्ता धारक त्यांच्या छोट्या छोट्या भूखंडावर जुनी घरे असल्याने त्यांची कुटुंबे वाढली पण जागा वाढली नाही त्यामुळे अशा जुनी घरे इमारती पडून त्याठिकाणी इमारती उभ्या करीत असताना अवघा एक टक्का चटई क्षेत्र मिळत असल्याने नाईलाजास्तव अनधिकृत बांधकामांचा आसरा इमारत मालकां कडून घेतला जात असून त्यामुळे शहरातील अनधिकृत बांधकामांच्या संख्येत वाढ झाली.

भिवंडी : भिवंडी (Bhiwandi) शहरातील जीलानी इमारत दुर्घटने नंतर शहरातील अनधिकृत, धोकादायक इमारतींची समस्या (Dangerous building problem) पुन्हा एकदा समोर आली आहे. या इमारत दुर्घटने नंतर नुकताच भिवंडी महानगरपालिका आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी भिवंडी शहरातील स्थापत्य अभियंते, बिल्डर्स यांना चर्चेसाठी बोलावले असता या बैठकीत शहरातील अनधिकृत बांधकामांना आळा घालवायचा असल्यास वाढीव चटई क्षेत्र (increased carpet area) मंजूर करावे अशी एकमुखी मागणी केली आहे. या बैठकीस आयुक्त डॉ पंकज आशिया ,अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे ,नगररचनाकार श्रीकांत देव ,आर्किटेक्चर आसोशिएशन चे अध्यक्ष जलाल अन्सारी ,सचिव जावेद आजमी ,दुराज [ के के ] कामणकर ,रविष धुरी ,के व्ही मराठे ,मायकल यांसह बिल्डर्स कृष्णा गाजंगी ,नारायण मच्छा,पिंटू कुमावत आदी उपस्थित होते.

शहरातील मालमत्ता धारक त्यांच्या छोट्या छोट्या भूखंडावर जुनी घरे असल्याने त्यांची कुटुंबे वाढली पण जागा वाढली नाही. त्यामुळे अशा जुनी घरे इमारती पडून त्याठिकाणी इमारती उभ्या करीत असताना अवघा एक टक्का चटई क्षेत्र मिळत असल्याने नाईलाजास्तव अनधिकृत बांधकामांचा आसरा इमारत मालकां कडून घेतला जात असून, त्यामुळे शहरातील अनधिकृत बांधकामांच्या संख्येत वाढ झाली. असल्याचे सांगत राज्य शासनाने ठाणे ,कल्याण या महानगरांमध्ये वाढीव चटई क्षेत्र मंजूर आहे. तर उल्हासनगर शहरासाठी क्लस्टर योजना राबविली परंतु शासनाने भिवंडी शहरा सोबत दुजाभाव करीत शहरातील चटई क्षेत्रात कधीच वाढ केली नाही. अशी खंत जावेद आजमी यांनी व्यक्त केली.

भिवंडी शहर हे कामगारांचे शहर म्हणून ओळखले जात असताना शहरातील इमारतींमध्ये घर खरेदी करणारे गरीब कामगार पैशांच्या अडचणीमुळे अशा अनधिकृत इमारतींमधून घर खरेदी करतात त्यामुळे शहरातील अनधिकृत इमारतींना पायबंद घालण्यासाठी शासनाने तात्काळ भिवंडी शहरात क्लस्टर योजना राबवून चार वाढीव चटई क्षेत्र मंजूर करावा अशी मागणी दुराज [ के के ] कामणकर यांनी या बैठकीत केली. शहराच्या विकासासाठी आम्ही सहकार्य करायला तयार आहोत परंतु त्यासाठी शासनाने सुध्दा शहर विकास नजरेसमोर ठेवून तीन ते चार वाढीव चटई क्षेत्र मंजूर करावा अशी मागणी बिल्डर्स आसोशिएशनचे पदाधिकारी कृष्णा गाजंगी यांनी केली आहे .या सर्व चर्चेअंती आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी या मागण्यां संदर्भात आपण शासना कडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.