चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या शाळांना मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन-  आमदार डावखरे यांच्या पाठपुराव्याला यश

कल्याण : निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या कोकणातील शाळांना मदत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असून कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे व भाजपा शिक्षक सेल

 कल्याण : निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या कोकणातील शाळांना मदत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असून कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे व भाजपा शिक्षक सेल मुंबई विभाग संयोजक अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.निसर्ग चक्रीवादळाचा फटका अनेक घरांसोबतच कोकणातील शाळांनाही बसला असून शासनाने तातडीने शाळांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी आमदार निरंजन डावखरे व जनता शिक्षक महासंघ कोकण विभागाचे अध्यक्ष व  भाजपा शिक्षक सेल मुंबई विभाग संयोजक अनिल बोरनारे यांनी ९ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्र देऊन केली होती.

निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानभरपाई संदर्भात राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर  यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नुकतीच भेट घेतली. या बैठकीला भाजपा नेते आशिष शेलार विनोद तावडे,  कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे व भाजपाचे इतर नेते उपस्थित होते. या बैठकीत शाळांना नुकसान भरपाई देण्याबाबत मागणी करण्यात आली यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य करून लवकरच निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले. चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या कोकणातील शाळांना आर्थिक मदत करण्याबाबत  मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याने निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी तसेच सिधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यातील शाळांना फटका बसलेल्या शाळांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे भाजपा शिक्षक सेलचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.