रेल्वेच्या डब्यात सापडले धड नसलेले शीर, विचित्र अपघाताची बातमी ऐकून उडाली खळबळ

रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मुंबईहुन आलेली लोकल अंबरनाथ(ambernath) रेल्वे स्थानकात सायडिंगला गेली. त्याच वेळी लगेजच्या डब्यात एका तरुणाचे धड नसलेले शीर(dead body head found in train) आढळल्याचे स्टेशन मास्टरांनी रेल्वे पोलिसांनी सांगितले.यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

    अंबरनाथ : अंबरनाथ(ambernath) रेल्वे स्थानकाच्या यार्डात असलेल्या लोकल डब्यात धड नसलेले शीर(dead body head found in train) आढळल्याने खळबळ उडाली आहे.रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मुंबईहुन आलेली लोकल अंबरनाथ रेल्वे स्थानकात सायडिंगला गेली. त्याच वेळी लगेजच्या डब्यात एका तरुणाचे धड नसलेले शीर आढळल्याचे स्टेशन मास्टरांनी रेल्वे पोलिसांनी सांगितले.यावेळी पोलिसांनी अंबरनाथ यार्डात जाऊन शीर ताब्यात घेत व्यक्तीचे धड शोधायला सुरुवात केली.याच दरम्यान अंबरनाथ उल्हासनगर रेल्वे स्थानकामध्ये एक व्यक्तीचे धड पोलिसांना आढळले.

    रात्रभर तो माणूस लोकलच्या दरवाज्यात उभा असावा. उल्हासनगर रेल्वे स्थानकजवळ एका वळणावर तो खांबाला आदळला असावा. त्यामुळे त्याचे धड व शीर वेगळे झाल्याची शक्यता आहे. हा अपघात असावा असे आतापर्यंतच्या तपासावरून दिसते.

    - सुनील पाटील ,सहाय्यक पोलीस आयुक्त, रेल्वे, कल्याण

    या संबंधी अधिक तपास केला असता मृत व्यक्तीचे नाव हितेंद्र राजभर ( ३८) असून तो डोंबिवलीचा रहिवासी असल्याचे समोर आले आहे.हितेंद्र उल्हासनगर स्थानकावरून मध्यरात्री १२.२० च्या शेवटच्या लोकलमध्ये चढला होता.यावेळी तो दरवाजात उभा असतांना त्याचे डोके रेल्वे रुळाजवळील असलेल्या खांबाला आदळले. यात त्याचे शीर लोकलच्या डब्यात राहिले आणि धड उल्हासनगर स्थानकाजवळ रेल्वे रुळाच्या बाजूला पडले होते, अशी माहिती रेल्वे सहायक पोलिस आयुक्त सुनील पाटील यांनी दिली.

    ही हत्या नसून रेल्वे अपघात असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे,सध्या रेल्वे पोलीसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू केला आहे.