ठाण्याच्या नागलाबंदर खाडी परिसरात सापडला चिखलाने माखलेला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, बातमीने उडाली खळबळ

ठाण्याच्या(Thane) नागलाबंदर(naglabander) या खाडी परिसरात सोमवारी सायंकाळी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह (Dead Body Found) आढळला.

    ठाणे : ठाण्याच्या(Thane) नागलाबंदर(naglabander) या खाडी परिसरात सोमवारी सायंकाळी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. हा मृतदेह(Dead Body Found) कासारवडवली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. या मृतदेहाची नोंद कासारवडवली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून मृतदेह कोणाचा आहे याचा शोध पोलीस घेत आहेत.

    सोमवारी सायंकाळी घोडबंदर रोड वरील नागलाबंदर, रोशा इलाईट रोड भाईंदर पाडा घोडबंदर रोड या खाडीच्या किनारी एका अज्ञात मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक पोलीस ठाणे यांनी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. हा मृतदेह हात चिखलाने माखलेला होता. हा मृतदेह कुणाचा आहे ?मृत व्यक्ती कुठे राहणारे आहे? याचा शोध आता कासारवडवली पोलीस स्टेशन घेत आहे. कासारवडवली पोलीस मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहेत.