आपटी येथील उल्हास नदीत दोघांचा बुडाल्याने मुत्यू

टिटवाळा : कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी लॉकडाऊन सुरू असुन संचारबंदी असतानाही कल्याण तालुक्यातील आपटी येथील उल्हास नदीत बंधाऱ्याजवळ पाण्यात बुडून एका २१ वर्षीय युवकासह १८ वर्षीय

 टिटवाळा : कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी लॉकडाऊन सुरू असुन संचारबंदी असतानाही कल्याण तालुक्यातील आपटी येथील उल्हास नदीत बंधाऱ्याजवळ पाण्यात बुडून एका २१ वर्षीय युवकासह १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला असून ही घटना शुक्रवारी दुपारी ४.१५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

सध्या सर्व कोरोना व्हायरस संकटामुळे लॉकडाऊन सुरु आहे. या महामारीचे गांभीर्य ओळखून शासकीय यंत्रणा जीव धोक्यात घालून काम करीत आहे. सध्या सर्वत्र जमावबंदी, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अनेक नागरिकांनी स्वतः घरी राहून लाॅकडाऊनचे पालन करीत आहेत. तर दुसरीकडे काही महाभाग बिनधास्त मौजमजा करायला बाहेर पडत आहेत. असेच पंजाबी काॅलनी, आणि धोबीघाट उल्हासनगर येथे राहणारे दिपेश वालाजी परमार ,त्यांची पत्नी  चैताली  व तिची मैत्रीण  गुंजन सुनील लंभाना  हे तिघे अजून एक मित्र असे चार जण कल्याण  तालुक्यातील आपटी गावातील उल्हास नदी बंधाऱ्याखाली असलेल्या परशी येथे फिरायला गेले होते. यातील दिपेश हा पाण्यात पडला व बुडू लागला तोच गुंजन ही त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरली. पण पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले तर पत्नी चैताली समोर पती ,मैत्रीण बुडल्याची घटना शुक्रवारी दुपारी  ४. १५  वाजण्याच्या सुमारास घडली. गोवेली पोलीस चौकीचे इन्स्पेक्टर प्रदीप अरोटे हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले व दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. ते ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठविण्यात आले आह

 कोरोनोच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील लाॅकडाऊन ३१मे पर्यंत वाढविण्यात आले आहे. पण काही भागात शिथिलता देण्यात आली आहे.याचा गैरफायदा घेऊन तसेच कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ बदलापूर, शहापूर येथे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत असे असताना ही कल्याण मुरबाड महामार्गावर अनावश्यक गर्दी दिसत आहे. रायते, येथील उल्हास नदीच्या काठावर पोहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अशीच परिस्थिती रुदा येथील काळू नदी, खडवली येथील भातसा नदीत, दिसून येत आहे. सर्व कामे पोलीसांनी करायला हवे का, आपली काही जबाबदारी नाही का? याचा विचार व्हायला हवा, त्यामुळे आपल्या कडून लाॅकडाऊनचे पालन होते का ते लागू आहे का असा प्रश्न यानिमित्ताने उभा ठाकला आहे.