भिवंडी इमारत दुर्घेटनेतील मृत्यूची संख्या १८ वर

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी (Bhiwandi) येथे तीन मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली (building collapse) आहे. ही इमारत बेकायदा असून सोमवारी पहाटेच्या सुमारास कोसळली. या दुर्घेटनेतील मृत्यूची संख्या १८ वर पोहचली आहे. यामध्ये सात मुलांचा समावेश आहे. तर २५ जण जखमी झाले आहेत.

 मिळालेल्या माहितीनुसार, इमारत आणि ढिगाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी अरुंद रस्ता यांमुळे मदत पथक वेळेवर पोहोचूनही प्रत्यक्षात बचावकार्य सुरू होण्यात बऱ्याच अडचणी आल्याचं सांगतिलं जात आहे. तसेच ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. जखमींना महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे जाऊन शिंदे यांनी जखमींची विचारपूस केली. या दुर्घटनेची चौकशी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिलानी अपार्टमेंट हाऊस नंबर ६९ ही इमारत १९८४ साली बांधली गेली होती. महापालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीत या इमारतीचा समावेश होता. ही इमारत रिकामी करण्याची नोटीसही महापालिकेने बजावली होती. या इमारत दुर्घटनाप्रकरणी तत्कालीन प्रभाग समिती-३ साहाय्यक आयुक्त सुदाम जाधव आणि अभियंता दुधनाथ यादव यांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश भिवंडी महापालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहे.