गणेशोत्सवाच्या महारक्तदान शिबिरातील रक्त महाड दुर्घटनाग्रस्तांसाठी पाठवण्याचा निर्णय 

भिवंडी : भिवंडी शहरात धामणकर नाका मित्र मंडळातर्फे गणेशोत्सवादरम्यान आयोजित भारतरत्न डॉ ए पी जे कलाम महारक्तदान शिबिरासोबतच कोव्हिड तपासणीसाठी अँटिजेन व क्षयरोग तपासणी महानगरपालिका आरोग्य पथकाकडून सुरू करण्यात आली आहे.महानगरपालिका कोव्हिडं चाचणीच्या नोडल अधिकारी डॉ.बुशरा सैय्यद यांच्या शुभहस्ते या चाचणी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.

तर मंगळवारी प्रथमच रक्तदान करण्यासाठी मोठ्या संख्येने युवक – युवती उपस्थित झाल्याने या रक्तदात्यांचा सन्मान करताना संस्थाध्यक्ष संतोष शेट्टी यांनी सोमवारी महाड येथे इमारत दुर्घटनेत जखमी झालेल्या जखमींकरीता रक्तदान शिबिरातील संकलीत रक्त पाठवण्याचा निर्णय जाहीर केला.या ठिकाणी अँटिजेन तपासणीत परिसरातील नागरीक पॉझिटिव्ह आढळताच त्यांना उपचारासाठी पालिकेच्या कोव्हिडं केअर सेंटरमध्ये पाठवण्यात आले.