लग्नास नकार देणाऱ्या प्रेयसीला  झाडावर लटकवून खून करणारा विकृत प्रियकर गजाआड

भिवंडी : लग्नास  नकार देणाऱ्या  प्रेयसीची  एका ३१ वर्षीय विकृत प्रियकराने तिचा ओढणीच्या सहाय्याने झाडावर लटकवून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खळबळजनक बाब म्हणजे त्या प्रेयसीला फिरण्याच्या बहाण्याने बोलावून तिला निर्जनस्थळी नेऊन झाडाला गळफास देऊन तिचा खून केला.त्यानंतर तिने आत्महत्या केल्याचा बनाव या विकृत  प्रियकराने रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. 

या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात खुनी प्रियकराविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला सापळा रचून डोंबिवली पश्चिम भागातून अटक करून आरोपीला कोनगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.दिपक जगन्नाथ रुपवते ( वय ३१ रा. गोविंदवाडी,कल्याण पश्चिम ) असे अटकेत असलेल्या खुनी प्रियकराचे नाव आहे.त्याला तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक जिवन शेरखाने यांनी रविवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यास २० ऑगष्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.तर किरण सावळे (२४) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव असून ती चंदनशिवनगर ,वाडेघर गाव,कल्याण पश्चिम येथे राहत होती.  मृतक तरुणी व आरोपी दीपक यांच्यात काही महिन्यापूर्वी ओळख होऊन ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले होते.आरोपी दीपक हा व्यवसायाने रिक्षा चालक असून त्याने मृत किरणकडे लग्नाचा तगादा लावला होता.मात्र किरण त्याच्याशी विवाह करण्यास नकार देत होती. त्यामुळे त्याने प्रेयसी किरणचा काटा काढण्याचे ठरवले.त्याप्रमाणे ९ ऑगस्ट रोजी तिला कल्याणमधून फिरण्याच्या बहाण्याने रिक्षात बसून  भिवंडी बायपास येथील टाटा आमंत्रण बिल्डिंगच्यामागे असलेल्या झाडाझुडपात नेले.त्याठिकाणी पुन्हा तिच्याकडे लग्नाचा तगादा लावला असता दोघांमध्ये वाद होऊन त्याने तिच्या ओढणीच्या सहाय्याने गळा आळवूनखूनकेलावओढणीनेझाडालालटकवून  तो घटनास्थळावरून फरार झाला होता.या घटनेची माहिती ३ दिवसांनी स्थानिक कोनगाव पोलीस ठाण्यात कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करीत तिचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना करून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद १२ ऑगस्ट रोजी करण्यात आली होती.

दरम्यान मृतक तरुणीने आत्महत्या केली नसून तिचा खून झाल्याचे उत्तरीय वैद्यकीय अहवालात समोर आले. त्यांनतर कल्याण गुन्हे शाखेचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की भिवंडी बायपास येथील टाटा आमंत्रण बिल्डिंगचेमागे एका तरुणीला तिच्या प्रियकराने जीवे मारले आहे व तो व्यक्ती डाेबिंवली पश्चिम भागात फिरत आहे.अशी माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजू जॉन यांनी तात्काळ स.पो.नि.भूषण दायमा,पो.उप.निरी.नितीन मुदगुन, पो.हवा.दत्ताराम भोसले यांना बातमीची शहानिशा करून पुढील कारवाई करणेबाबत मार्गदर्शन करून आदेश केले त्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या पथकाने कोनगाव पोलीस ठाण्याशी  संपर्क साधला असता  १२ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास मुंबई नाशिक हायवेलगत टाटा आमंत्रण बिल्डिंगच्या मेन गेटपासून ५० मीटर अंतरावर झाडाझुडपात एका अनोळखी महिलेचा मृतदेह छोट्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला होता. या प्रकरणी भिवंडी कोनगाव पोलिस ठाण्यात   अकस्मात मृत्यूची नोंद दाखल असल्याचे या पोलीस पथकाला सांगण्यात आले. त्यानुसार  वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजू जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.भूषण दायमा,पो.उप.निरी.नितीन मुदगुन,पो.हवा. दत्ताराम भाेसले,राजेंद्र घाेलप,राजेंद्र खिल्लारे, मंगेश शिर्के,अजित राजपुत, सुरेश निकुळे,बाळा पाटील, हरीचंद्र बंगारा,राहुल ईशी या  पथकाने डोंबिवली पश्चिम भागात जाऊन रेल्वे स्टेशन परिसर, गुप्ते रोड, बागशाळा  मैदान असा परिसर पिंजून काढला शेवटी कोपर ब्रिजजवळ एक व्यक्ती बातमीदाराने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे  संशयास्पद स्थितीत फिरताना दिसून आला असता त्याला पोलिसांचा संशय येताच तो पळू लागला त्यामुळे त्यास पोलिस पथकाने पाठलाग करून पकडले व ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे  दिपक जगन्नाथ रुपवते असे सांगितले पोलिसांना  मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने कसून चौकशी करून विचारपूस केली असता त्याने त्याची प्रेयसी किरण हि लग्नाला नकार देत असल्याच्या कारणामुळे तिचा खून केल्याची कबुली त्याने दिली असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.विशेष म्हणजे कुठलाही सुगावा नसताना  खुनाचा गुन्हा उघडकीस आल्याने गुन्हे शाखा युनिट-3 कल्याण पोलिसांचे वरिष्ठाकडून  कौतूक होत आहे.