वीज बिलांसाठी दिल्ली पॅटर्न राबविण्याची आम आदमी पक्षाची मागणी

कल्याण : लॉकडाऊनमुळे त्रस्त असलेले नागरिक आता आलेल्या भरमसाठ वीजबिलांमुळे त्रस्त झाले आहेत. नागरिकांचा हा त्रास लक्षात घेऊन कल्याणमध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने महावितरणच्या तेजश्री कार्यालयावर

 कल्याण : लॉकडाऊनमुळे त्रस्त असलेले नागरिक आता आलेल्या भरमसाठ वीजबिलांमुळे त्रस्त झाले आहेत. नागरिकांचा हा त्रास लक्षात घेऊन कल्याणमध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने महावितरणच्या तेजश्री कार्यालयावर धडक देत आंदोलन करण्यात आले. दिल्लीमध्ये ज्याप्रमाणे २०० युनिटपर्यंत जनतेला वीजबिल माफ केले आहे त्याचप्रमाणे दिल्ली  पॅटर्न राबविण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

कोरोना महामारीच्या काळात गेले तीन महीने लॉकडाऊन काळात अनेक नागरीकांचे रोजगार गेलेले आहेत. केंद्र व राज्य सरकारकारने कुठल्याही प्रकारे योग्य नियोजन केलेले नाही. त्यातच महावितरणने वाढीव लाईट बील पाठून जनतेची आर्थिक कोंडी केलेली आहे.  यासाठी आम आदमी पक्षाच्या वतीने ३ जून  रोजी प्रथम राज्यव्यापी आंदोलन केले होते. यावेळी मुख्यमंत्री,  ऊर्जामंत्री,  विद्युत महामंडळ यांनी लेखी निवेदन देत ज्याप्रमाणे दिल्लीतील आप सरकारने २०० युनिटपर्यंत जनतेला वीजबिल माफ केलेले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील जनतेला मार्च, एप्रिल, मे व जूनपर्यतंचे २००  युनिटप्रमाणे वीजबिल माफ करण्याची मागणी केली होती. मात्र असे न करता याउलट महावितरण प्रशासनाने वाढीव वीजबिल पाठवून नागरीकांची आर्थिक कोंडी केली आहे.  शिवाय मे महीन्यापासुन विद्युत महामंडळाने वीजदर वाढवलेला आहे. त्याला त्वरीत स्थगिती द्यावी यासाठी आज आम आदमी पक्षाच्या वतीने महावितरण कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. हा वीजदर वाढीचा निर्णय मागे घेतला नाही तर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन सुरू करू, असा इशारा कल्याण लोकसभा अध्यक्ष  अॅड.धनजय जोगदंड यांनी दिला आहे. या आंदोलनात  रवि केदारे, राजेश शेलार, राजु पांडे, संदीप नाईक,  कल्पना आहेर आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.