मुरबाडच्या अँटीजन रॅपिड टेस्ट केंद्रातील कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी

मुरबाडच्या अँटीजन रॅपिड टेस्ट केंद्रातील कर्मचाऱ्यांनी केला होता.या गंभीर प्रकाराची चौकशी करून यातील दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी मनसेने केली आहे. कोणत्याही प्रकारची चाचणी नं करता मुरबाडच्या अँटीजन रॅपिड टेस्ट केंद्रातील कर्मचाऱ्यांनी येथील एका मुलीला कोरोना पॉझिटिव्ह म्हणून घोषित केले होते.

 मुरबाड : कोणत्याही प्रकारची टेस्ट नं करता मुलीला कोरोना पॉझिटिव्ह म्हणून घोषित करण्याचा प्रताप मुरबाडच्या अँटीजन रॅपिड टेस्ट केंद्रातील कर्मचाऱ्यांनी केला होता.या गंभीर प्रकाराची चौकशी करून यातील दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी मनसेने केली आहे. कोणत्याही प्रकारची चाचणी नं करता मुरबाडच्या अँटीजन रॅपिड टेस्ट केंद्रातील कर्मचाऱ्यांनी येथील एका मुलीला कोरोना पॉझिटिव्ह म्हणून घोषित केले होते. नुकत्याच घडलेल्या या प्रकाराने तालुक्यात खळबळ माजली होती.मनसेचे मुरबाड शहर अध्यक्ष नरेश देसले यांनी या प्रकरणी तालुका वैद्यकीय अधिकारी श्रीधर बनसोडे यांना निवेदन दिले आहे.

हा सर्व प्रकार अतिशय गंभीर असून यामुळे तालुक्यातील सर्व सामान्य रुग्णांमध्ये या टेस्ट केंद्राबाबत साशंकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.येथील कर्मचाऱ्यांच्या या बेजबाबदार आणि अनागोंदी कारभारामुळे सदर मुलगी, तिचे कुटुंबीय आणि शेजारी भितीच्या सावटाखाली आले आहेत. या कुटुंबाला या सर्व प्रकारामुळे प्रचंड मानसिक त्रास झाला.हा आजार झाल्याच्या केवळ भीतीमुळे अनेक व्यक्ती दगावल्याच्याही घटना तालुक्यात घडल्या आहेत.या कुटुंबातील सदस्य मानसिक तणावामुळे त्रस्त असले तरी, सुदैवाने या कुटुंबातील व्यक्तीबाबत कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही.

शिवाय या मुलीच्या नावाच्या ट्यूबमध्ये ज्या व्यक्तीचे पॉझिटिव्ह स्वॅब होते, सदर व्यक्ती ही खुलेआम इतरत्र वावरलीही असेल, शिवाय ही व्यक्ती अनेकजणांच्या संपर्कातही आली असेल.तालुक्यातील निरोगी व्यक्तींसाठी हा प्रकार घातक आहे.’ असे देसले यांनी निवेदनात म्हटले असून या सर्व गंभीर प्रकारची चौकशी करून यास जबाबदार असणाऱ्या बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई मागणी त्यांनी केली आहे.