गोदूताई परुळेकर मार्क्सवादी विचार मंच आणि पुरोगामी लोकहितवादी विचार मंचाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर

वाडा: गोदूताई परुळेकर मार्क्सवादी विचार मंच आणि पुरोगामी लोकहितवादी विचार मंचाच्या वतीने आज वाडा व भिवंडी तहसीलदार कार्यालय यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी व कृषी मंत्रालय यांच्या नावे केंद्र

वाडा: गोदूताई परुळेकर मार्क्सवादी विचार मंच आणि पुरोगामी लोकहितवादी विचार मंचाच्या वतीने आज वाडा व भिवंडी तहसीलदार कार्यालय यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी व कृषी मंत्रालय यांच्या नावे  केंद्र सरकारच्या शेती व शेतकरी शेतमजूरांच्या दुर्लक्षित २७ मे च्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे होत असलेल्या देशव्यापी निषेध दिना निमित्त विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने अनियोजित व अविचार पद्धतीने जाहीर केला आहे.त्यामुळे शेतकरी,शेतमजूर, असंघटित कामगार  यांचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. ते सोडविण्यात केंद्र सरकार आणि बहुतांशी राज्यातील सरकारी यंत्रणा अपयशी ठरली आहे, याची चिंता व्यक्त करण्यात येतेय.यासाठी कॉम्रेड गोदावरी परुळेकर माक्सवादी विचारमंच तर्फे, शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी, नवीन कर्ज  देण्यात यावे, लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ व्हावे,  शेतकरी शेतमजूर,प्रवासी, असंघटित कामगार, यांना लॉकडाऊन काळातील दर महा रुपये दहा हजार थेट रक्कम द्यावी, आदी मागण्यांचे निवेदन केंद्र सरकारला देण्यासाठी वाडा तहसीलदार कार्यालयात लहानू डावरे यांनी  दिले. तर भिवंडी तहसीलदार यांना कॉम्रेड बळीराम चौधरी,कॉम्रेड रामचंद्र गिम्बल, कॉम्रेड रामचंद्र दास कॉम्रेड अंजय्या बंडा यांच्याकडून मागणी निवेदन व निषेधाचे निवेदन देण्यात आले.