शिधापत्रिकांसाठी श्रमजीवी संघटनेचे आंदोलन

मुरबाड: शिधापत्रिका नसणाऱ्या आदिवासी कुटुंबांना तात्काळ शिधापत्रिका देण्यात याव्यात या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेने आज मुरबाड तहसीलदार कार्यालयासमोर लॉकडाऊनचे नियम पाळून आंदोलन केले. सध्या

 मुरबाड: शिधापत्रिका नसणाऱ्या आदिवासी कुटुंबांना तात्काळ शिधापत्रिका देण्यात याव्यात या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेने आज मुरबाड तहसीलदार कार्यालयासमोर लॉकडाऊनचे नियम पाळून आंदोलन केले. सध्या लॉकडाऊनमुळे रोजगार नाही, तसेच ग्रामीण भागातील उद्योग धंदेही बंद असल्याने येथील आदिवासी कुटुंबांची मोठ्या प्रमाणात उपासमार सुरू आहे. रेशनवरील धान्य हे ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहेत त्यांनाच मिळत आहे.मात्र शिधापत्रिका नसलेली तालुक्यात शेकडो कुटुंबे आहेत.शिधापत्रिका नव्याने काढण्यासाठी लॉकडाऊनमुळे कागदपत्रांचीही अडचण येत असल्याने शिधापत्रिका नसलेल्या आदिवासींची परवड सुरू आहे. त्यामुळे दिनेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली पन्नास आदिवासींनी मुरबाड तहसीलदार कार्यालयासमोर हक्काग्रह आंदोलन केले. यावेळी तहसीलदार कार्यालयाकडून पन्नास शिधापत्रिका या तत्काळ देण्यात आल्या.