पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर कमी करण्याची मागणी

भिवंडी - सर्वत्र कोरोनाचे संकट पसरले असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाकडून मागील तीन महिन्यांपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या

 भिवंडी –  सर्वत्र कोरोनाचे संकट पसरले असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाकडून मागील तीन महिन्यांपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांसह अल्प उत्पन्न असलेल्या नोकरदार व व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली असून देशात प्रचंड मंदीचे सावट पसरले आहे. कोरोनाच्या संकटात नागरिक होरपळत असतांनाच आता केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ केली आहे.

केंद्र सरकारच्या या इंधनवाढी विरोधात कॉंग्रेसने देशभर आंदोलने सुरु केली असून केंद्र शासनाने पेट्रोल व डीझेलवर केलेली भाववाढ त्वरित कमी करावी. अशी मागणी कॉंग्रेसच्या योजना सनियंत्रण समितीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष इरफान पटेल यांनी राज्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे त्यांनी आपले निवेदन दिले आहे.