padgha health centre

भिवंडी: ठाणे जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येत असलेल्या पडघा प्राथमिक आरोग्य केंद्रात(padgha primary heath centre) डॉक्टर उपलब्ध नसल्याने अपघात झालेल्या रुग्णावर उपचार होत नसल्याने संबंधित आरोग्य केंद्राच्या डॉक्टरणावर फौजदारी कारवाई करण्याची रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे.

भिवंडी तालुक्यातील पडघा  गावाच्या अंतर्गत असलेल्या पडघा प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर पावरा हे नियमित उपस्थित राहत नसल्याने तसेच या दवाखान्यात नर्स ,तसेच वॉर्डबॉय हे कधीतरी कामावर येत असल्याचे आरोप रुग्णाचे नातेवाईक करीत असून या रुग्णालयातून रुग्णांना उपचाराअभावी इतर खासगी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागते. कधीकधी उपचार न मिळाल्याने रुग्ण तेथेच मृत्युमुखी पडत असल्याचे आरोप नातेवाई करीत आहेत. या पडघा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे.