rto office bhivandi

भिवंडी: भ्रष्ट मार्गाने परिवहन आयुक्त म्हणून पदोन्नती मिळवणारे परिवहन आयुक्त कार्यालयातील कर्मचारी अरुण नारायण भालचंद्र यांची तात्काळ चौकशी करून त्यांचे विरुद्ध सक्त कारवाई करण्याची मागणी राष्ट्रीय मानव हक्क मंचचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते शरद धुमाळ यांनी महाराष्ट्र राज्यचे  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे एक निवेदनाद्वारे केली असून निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केल्या आहेत.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग हा भ्रष्टाचाराचे आगार समजला जात असून परिवहन विभागास पडलेला दलालांचा विळखा, करोडो रुपये बाल पोषण अधिभार वसूल न केल्यामुळे आदिवासी बालकांचे होणारे कुपोषण, अधिकाऱ्यांनी शासनाचा बुडावलेला लाखो रुपयांचे मुद्रांक शुल्क, बनावट टॅक्सी रिक्षा परवाने, खाजगी व्यक्तींचा सुळसुळाट, पर्यावरण कराची हानी यासारखे प्रकरणे गाजत असताना परिवहन आयुक्तलयाने अस्तित्वात नसलेल्या पदावर अरुण भालचंद्र यांना पदोन्नती दिली आहे.

सह. परिवहन आयुक्त हे संविधानिक व परिवहन आयुक्त कार्यालयामध्ये आस्थापनेवर अस्तित्वात नसलेले पद आहे. तरी देखील महाराष्ट्र शासन व परिवहन विभाग यांनी परिवहन आयुक्त या बोगस पदावर अरुण भालचंद्र यांची नेमणूक केली आहे. या मागचे गौडबंगाल म्हणजे परिवहन विभागात चालणाऱ्या मोठा भ्रष्टाचार व घोटाळे हे आहेत. अस्तित्वात नसलेल्या सह. परिवहन आयुक्त या पदावर अरुण भालचंद्र यांना पदोन्नती दिल्यामुळे फार मोठी अनियमितता होऊन शासनाचे लाखो रुपयांचे झालेले नुकसानास जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत असून आंधळा दळतो व कुत्रा पिठ खातो या म्हणीची पूर्तता होत असल्याचे दिसून येत असून शासन या प्रकरणी कोणती भूमिका घेते याकडे सुजाण नागरिकांचे लक्ष लागले आहे.