पालघर जिल्ह्यातील वावेघर गावात डेंग्युचे २ रुग्ण

वाडा: पालघर जिल्ह्यातील वावेघर या गावात डेंग्यूचे २ रुग्ण आढलले असून ७ जणांचे रिपोर्ट डहाणू रुग्णालयात येथे पाठविण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील वावेघर यागावातील एका पाड्यात २

वाडा: पालघर जिल्ह्यातील वावेघर या गावात डेंग्यूचे २ रुग्ण आढलले असून ७ जणांचे रिपोर्ट डहाणू रुग्णालयात येथे पाठविण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील वावेघर यागावातील एका पाड्यात २ जणांना डेंग्यूची लागण झाली असून त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत तर इतर ७ जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. १४ एप्रिल रोजी या वावेघर भागात पहिला  रुग्ण  सापडल्याने तेथे काही कुटुंबाचे तपासणी नमुने घेण्यात आले.यात काही पॉझिटिव्ह तर काही निगेटिव्ह रिपोर्ट आले आहेत. तरी सर्वांची पुन्हा चाचणी घेऊन पाठवण्यात येणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. या भागात काही दिवशी ग्रामपंचायतीकडून फवारणी करण्यात आली यात बाहेरील डास हे घरात आले.आणि चाचणी घेतलेल्या कुटुंबाच्या घरच्या परिसरातील पाण्याने भरलेल्या कुंड्या,प्लास्टिक बाटल्या,ड्रम,जनावरांचे गोठे असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी एस. बुरपुल्ले यांनी सांगितले. या परिसराचा सर्व्हे चालू असून एका पॉझिटिव्ह रुग्णाला वाडा येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू असून एक रुग्ण घरी आहे.अशी माहिती त्यांनी दिली.