आपल्या देशात ४ लसी तयार केल्या नसत्या तर आपण कायमचे लॉकडाऊनमध्ये गेलो असतो – फडणवीस

आज आपण आपल्या देशात चार लसी(4 Vaccine Made In India) तयार केल्या. त्या केल्या नसत्या तर अमेरिका आणि ब्रिटनने आधी आम्ही लसीकरण करतो, नंतर तुम्हाला लस देऊ असे आपल्याला सांगितले असते. त्यामुळे आपण कायमच्या लॉकडाऊनमध्ये गेलो असतो, असे फडणवीस(Fadanvis) म्हणाले.

    नवी मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधान सभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis In Navi Mumbai) नवी मुंबईत एका कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितले की, कोरोनाशी(Corona) आपण सर्वच संघर्ष करत आहोत. त्याचा अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला आहे. केंद्र सरकारने आर्थिक पॅकेजही(Economic Package) दिले आहे. मात्र भारतासारख्या महाकाय देशात लसीकरण मोहीम(Vaccination Drive) राबवणे हे कठिण काम होते. आज आपण आपल्या देशात चार लसी(4 Vaccine Made In India) तयार केल्या. त्या केल्या नसत्या तर अमेरिका आणि ब्रिटनने आधी आम्ही लसीकरण करतो, नंतर तुम्हाला लस देऊ असे आपल्याला सांगितले असते. त्यामुळे आपण कायमच्या लॉकडाऊनमध्ये गेलो असतो, असे फडणवीस म्हणाले.

    माथाडींच्या लसीकरणासाठी दहा हजार लसी
    फडणवीस पुढे म्हणाले की, कोरोना लसीवरून नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तो दूर करणे गरजेचे आहे. लस घेतल्याने मृत्यू होतो, नपुसंकत्व येते, असे संभ्रम निर्माण करण्यात आले आहेत. मात्र, आता लसीचा प्रभाव लोकांच्या लक्षात आला आहे, असेही त्यांनी सांगितले. माथाडी कामगार हा अतिशय कठिण परिस्थितीत काम करणारा आहे. त्यांच्या लसीकरणाला प्राधान्य दिले पाहिजे. नरेंद्र पाटील यांनी लसीकरणासाठी चांगला प्रयत्न केला आहे. एनजीओच्या माध्यमातून मी स्वत: माथाडी कामगारांच्या लसीकरणासाठी दहा हजार लसी देईल. माथाडी कामगार स्वस्थ राहिला पाहिजे, असे ते म्हणाले. विदर्भ हे माझे कार्यक्षेत्र होते. त्यामुळे माथाडी चळवळ किती महत्त्वाची आहे, याचे महत्व मला नरेंद्र पाटील यांनी पटवून दिले. त्यामुळेच येत्या २३ सप्टेंबर रोजी केंद्रीय कामगार मंत्री नवी मुंबईत आणण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.