dharmveer nagar fire

ठाण्याच्या(thane) धर्मवीर नगरमधील(dharmveer nagar) (fire) सात माळ्याच्या इमारतीमधील सातव्या माळ्यावरील घरात टीव्हीला लागलेल्या आग आणि धुरामुळे एकाच खळबळ उडाली. दरम्यान सुरक्षिततेच्या कारणास्तव तब्बल १५० लोकांना इमारतीच्या बाहेर काढण्यात आले.

ठाणे :  ठाण्याच्या(thane) धर्मवीर नगरमधील(dharmveer nagar) (fire) सात माळ्याच्या इमारतीमधील सातव्या माळ्यावरील घरात टीव्हीला लागलेल्या आग आणि धुरामुळे एकाच खळबळ उडाली. दरम्यान सुरक्षिततेच्या कारणास्तव तब्बल १५० लोकांना इमारतीच्या बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी अग्निशमन दल पोहचले. तोपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले होते. यावेळी एका वयोवृद्ध महिलेला उचलून इमारतीतून बाहेर आणणाऱ्या अग्नीशमन दलाच्या जवानाचे विशेष कौतुक होत आहे.

धर्मवीरनगर येथील इमारतीत टिव्हीला अचानक लागलेल्या आगीने धुराचे लोट उठले होते. या धुराचे लोट पाहून इमारतीतील नागरिकांची गाळण उडाली. घरमालकाचा आग विझविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. मात्र आगीमुळे धुराचे लोळ उठल्याने धावपळ झाली. अग्निशमन दलाने मात्र मदतकार्य करीत १५० लोकांना इमारतीच्या बाहेर काढले. तर इमारतीतून अग्निशमन दलाचे जवान निलेश वेताळ यांनी एका वयोवृद्धाला उचलून घेऊन इमारतीच्या खाली सुरक्षित स्थळी आणले. टीव्ही संचाला लागलेली आग त्वरित विझविण्यात आली म्हणून अनर्थ टळला. धुराचे लोळ पाहून लोकांमध्ये घबरहाट पसरली होती.