Dhingana late into the night at the dancebar while locked down; Four officers suspended after the crackdown

हॉटेल जय श्रीकृष्ण रेस्टॉरंट (अँटिक पॅलेस), FL3 क्रमांक 1084, मुंबई आग्रा रोड, तीन पेट्रोल पंपाजवळ ठाणे (प) आणि मे आम्रपाली रेस्टॉरंट, FL3 क्र. 710, पार्वती निवास, डॉ. मुस रोड, तलावपाळी ठाणे (प) या अनुज्ञप्ति मध्ये उशिरापर्यंत छुप्या पद्धतीने डान्स बार सुरू असल्याची चित्रफीत वृत्तवाहिनीवर प्रसारित झाली होती. कार्य क्षेत्रीय अधिकारी या नात्याने या सर्वांची सदर कार्यक्षेत्रात गस्त घालण्याची, दक्ष राहून सदर अनुज्ञप्तींवर कारवाई करण्याची जबाबदारी होती.

    ठाणे : राज्यात सर्वत्र लॉकडाऊनचे निर्बंध लागू असताना ठाण्यात मात्र रात्री उशीरापर्यंत डान्सबारमध्ये धिंगाणा सुरु होता. छुप्या पद्धतीने डान्स बार सुरू असल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांच्याकडून कडक कारवाई करत या बार वर धाड टाकण्यात आली. या कारवाईत दिवसभरात १५ बारना टाळे ठोकण्यात आले. करोनाचे निर्बंध झुगारणाऱ्या आणखी काही बारचा शोध महापालिका अधिकाऱ्यांनी सुरू केला आहे. या सर्व कारवाईनंतर या परिसरातील चार कार्यक्षेत्रीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक बजरंग पाटील आणि प्रदीपकुमार सरजीने या अधिकाऱ्यांसह चार जणांचे निलंबन करण्यात आले. तर, दोन निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

    हॉटेल जय श्रीकृष्ण रेस्टॉरंट (अँटिक पॅलेस), FL3 क्रमांक 1084, मुंबई आग्रा रोड, तीन पेट्रोल पंपाजवळ ठाणे (प) आणि मे आम्रपाली रेस्टॉरंट, FL3 क्र. 710, पार्वती निवास, डॉ. मुस रोड, तलावपाळी ठाणे (प) या अनुज्ञप्ति मध्ये उशिरापर्यंत छुप्या पद्धतीने डान्स बार सुरू असल्याची चित्रफीत वृत्तवाहिनीवर प्रसारित झाली होती. कार्य क्षेत्रीय अधिकारी या नात्याने या सर्वांची सदर कार्यक्षेत्रात गस्त घालण्याची, दक्ष राहून सदर अनुज्ञप्तींवर कारवाई करण्याची जबाबदारी होती.

    परवाना कक्ष बंद ठेवण्याच्या ठरवून दिलेल्या वेळेनंतर उपरोक्त परवाना कक्ष सुरूच होते आणि कोविड नियमावलीच्या अंमलबजावणीचे पालन झाले नाही, यावरून त्यांनी शासकीय कामकाजात अत्यंत बेजबाबदारपणा दर्शविल्यामुळे त्यांच्यावर सदर कारवाई करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त अन्य संबंधित अधिकाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

    राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नियंत्रण कक्ष सर्व जनतेकडून सर्व जनतेकडून तक्रार स्वीकार करण्याकरिता (24×7) सुरू असून त्याचे टोल फ्री क्रमांक 18008333333 आणि व्हाट्सअँप क्रमांक 8422001133 आहे. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली आहे.