
कल्याण : भारतीय जनता पार्टीच्या कोकण विभागातील डिजिटल संपर्क अभियानाच्या माध्यमातून विविध मंडलाच्या बैठका संपन्न झाल्या. माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार अतुल भातखळकर, आमदार प्रशांत ठाकूर,
कल्याण : भारतीय जनता पार्टीच्या कोकण विभागातील डिजिटल संपर्क अभियानाच्या माध्यमातून विविध मंडलाच्या बैठका संपन्न झाल्या. माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार अतुल भातखळकर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, खासदार कपिल पाटील, प्रवक्त्या एन. सी शायना, प्रवक्ते माधव भंडारी, प्रवक्ते श्वेता शालिनी, प्रवक्त्या केशव उपाध्ये, संदीप लेले, भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे आदी आमदार तथा भाजपा प्रदेशचे नेते या बैठकांना मार्गदर्शन करत आहेत. या सर्व बैठकांचे समन्वयक म्हणून माजी आमदार तथा भाजपा प्रदेश सचिव नरेंद्र पवार काम पाहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये केंद्र सरकारला दुसऱ्या पंचवार्षिकच्या पहिल्या वर्षाची यशस्वी वर्षपूर्ती झाली आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या लोकाभिमुख आणि लोककल्याणकारी निर्णयाची विस्तृत माहिती या बैठकांमध्ये देण्यात आली. दरम्यान चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकत जास्तीत जास्त भारतीय वस्तू वापरण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. केंद्र सरकारच्या कामाचे मूल्यमापन झाले पाहिजे व सर्व घटकांपर्यंत पोहचले पाहिजे यासाठी डॉक्टर, वकील, सीए, इंजिनिअर, साहित्य, कला, क्रीडा, उद्योग, शिक्षण आदी विविध क्षेत्रातील तज्ञही या बैठकांना उपस्थिती लावत आहेत. कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर डिजिटल संपर्काच्या माध्यमातून या बैठका संपन्न होत आहेत.