फसवणुकीप्रकरणी दिशा डायरेक्ट मार्केटिंग सर्विसेसचे डायरेक्टर संतोष नाईक गजाआड

नाईक यांनी लोकांना शहापूर येथे सेकण्ड होमचे स्वप्न दाखवून गंडा घातला होता. मात्र आर्थिक गुन्हे शाखेला नाईक हे गुंगारा देत होते. अखेर आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाची मदत घेतली. युनिट-१ च्या पथकाने नाईक यांना अटक केली.

    ठाणे : नागरिकांना सेकंड होमच्या नावावर फसवणूक करणारा दिशा डायरेक्ट मार्केटिंग सर्विसेसचे डायरेक्टर संतोष नाईक याला ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पथक नाईक यांचा कशोशीने शोध घेत होते. अखेर आरोपी नाईकला गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाच्या मदतीने अटक करण्यात आलेली आहे.

    ठाण्यात सेकण्ड होमच्या नावाखाली तब्बल २५ लोकांना जवळपास ३ कोटी १५ लाख रुपयांना चुना लावला होता. दिशा डायरेक्ट मार्केटिंग सर्विसेसचे डायरेक्टर संतोष नाईक हे ठाण्याच्या हिरानंदानी इस्टेट येथे राहावयास होते. नाईक यांनी फसवणूक केल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाईक यांनी लोकांना शहापूर येथे सेकण्ड होमचे स्वप्न दाखवून गंडा घातला होता. मात्र आर्थिक गुन्हे शाखेला नाईक हे गुंगारा देत होते. अखेर आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाची मदत घेतली. युनिट-१ च्या पथकाने नाईक यांना अटक केली.