प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

कल्याण (Kalyan) खाडीत बेकायदेशीर रेती उत्खनन करणाऱ्या माफियांवर धडक कारवाई करून वाळूने भरलेला ट्रक (Truck), करेन असा १७ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ट्रक चालक आणि मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           

 ठाणे :   शासन आणि जिल्हा प्रशासनाची (District administration) बंदी असतानाही खाडीतून रेती उत्खनन करणाऱ्या माफियांच्या विरोधात जिल्हाप्रशासनाने धडक कारवाईची मोहीम सुरु केली. कल्याण खाडीत बेकायदेशीर रेती उत्खनन करणाऱ्या माफियांवर धडक कारवाई करून वाळूने भरलेला ट्रक, करेन असा १७ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ट्रक चालक आणि मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात  खाडीत बेकायदेशीर रेती उत्खनन करण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्या. याची गंभीरतेने दखल राजेश नार्वेकर यांनी वाळू माफियांवर कारवाईचे आदेश दिले. अप्पर जिल्हाहंडीकरी वैदेही रानडे यांच्या निर्देशावर ठाणे रेतीगट तहसीलदार मुकेश पाटील आणि कल्याण तहसीलदार दीपक आकडे यांनी टीमसह छापेमारी करीत पाच लाख रुपयांचा करेन, दोन लाखाचे इंजिन पंप आणि दहा लाख रुपये किमतीची ३० ब्रास रेती जप्त केली.

एका वर्षात १२ ठिकाणी केली कारवाई १ जानेवारी ते १४ डिसेंबर या कालावधीत जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या विविध भागात तब्बल १२ ठिकाणी छापेमारी केली. तर पाच वाळू माफियांवर धडक कारवाई करून गुन्हे दाखल केले. या बारा कारवाईत सेक्शन पंप, बार्ज, क्रेन अशा कोट्यवधींची सामुग्री जिल्हा प्रशासनाने जप्त केली.