diva damber gift

ठाणे : दिव्यातील (diva)अंतर्गत आणि प्रमुख रस्त्यांची अवस्था खूपच बिकट झाली आहे, त्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना खूपच त्रास सहन करावा लावत आहे. तसेच रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी(potholes on roads) निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जाते, असा आरोप करीत खड्ड्यांच्या समस्येविरोधात भाजपने आक्रमक होत, मंगळवारी पालिका अधिकाऱ्यांना डांबर भेट देत निषेध व्यक्त केला. 

ठाणे : दिव्यातील (diva)अंतर्गत आणि प्रमुख रस्त्यांची अवस्था खूपच बिकट झाली आहे. त्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना खूपच त्रास सहन करावा लावत आहे. तसेच रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी(potholes on roads) निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जाते, असा आरोप करीत खड्ड्यांच्या समस्येविरोधात भाजपने आक्रमक होत, आज पालिका अधिकाऱ्यांना डांबर भेट देत निषेध व्यक्त केला.

ठाणे महापालिकेच्या हद्दीत असणाऱ्या दिवा शहराच्या सोयी सुविधांकडे पालिकेकडून नेहमीच कानाडोळा केला जात असल्याचा आरोप दिवावासीयांकडून केला जातो. सध्या दिवा शहरातील अंतर्गत रस्ते व दिवा शहराला जोडणारे सर्व प्रमुख रस्त्याला प्रचंड खड्डे पडले आहेत. खड्ड्यात रस्ता की रस्त्यावर खड्डे अशी अवस्था पाहावयास मिळत आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे वाहन चालकांना  रस्त्यावरून वाहने चालविताना खूपच कसरत करावी लागत आहे. तसेच खराब रस्त्यांमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणेही त्रासदायक ठरत आहे. काही दिवसांपूर्वी रस्त्याच्या दुरास्थेवरून भाजपने मोर्चा काढला होता. मात्र रस्त्याची अवस्था जैसे थे आहे.

ठाणे शहरात खड्डे बुजवण्यासाठी ज्याप्रमाणे डांबर आणि सिमेंट काँक्रीटचा वापर केला जातो आणि दिवा शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी माती आणि खडी वापरली जाते,असा आरोप करीत भाजपने प्रभाग क्षेत्र कार्यालयावर धडक दिली. भाजपा दिवा मंडळ अध्यक्ष ॲड.आदेश भगत यांच्या नेतृत्वाखाली आज दिवा प्रभाग समितीच्या बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता यांना प्रतिकात्मक डांबर भेट देऊन निषेध करण्यात आला. यावेळी भाजपा ठाणे शहर युवा मोर्चा अध्यक्ष निलेश पाटील, कार्यकारणी सदस्य रोहिदास मुंडे, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर मंडळ सरचिटणीस समीर चव्हाण, ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत उपस्थित होते.