कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील डॉक्टरला कोरोनाची लागण

कल्याण : कल्याण डोंंबिवली मनपा क्षेत्रात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आता कोरोनाने मनपाच्या आरोग्य विभागात शिरकाव केला आहे. एका कोरोना योध्दा डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याने

 कल्याण : कल्याण डोंंबिवली मनपा क्षेत्रात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आता कोरोनाने मनपाच्या आरोग्य विभागात शिरकाव केला आहे. एका कोरोना योध्दा डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याने आरोग्य विभागाच्या प्रशासकीय यंत्रणेवरील ताण वाढत आहे. कोरोना संसर्गाला आळा बसण्यासाठी आरोग्य विभागासह प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असुन कोरोना रूग्णांची वाढती संख्या प्रशासन  रोखण्यासाठी उपाययोजना करीत असले तरी  दिवसेंदिवस कोरोना रूग्ण संख्या वाढत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या कल्याण पश्चिमेत राहत असणाऱ्या डॉक्टरला गेल्या चार दिवसांपासुन ताप येत असल्याने होम क्वारंटाईन होते. त्यांचा स्वॅब चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने आता आरोग्य विभागात कोरोनाने शिरकाव केल्याने प्रशासकीय यंत्रणेने आता आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घेत सर्व सुरक्षितता बाबीसंह दक्षता घेऊन कोरोना योद्ध्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.