डॉक्टर आपल्या दारी, विनामूल्य वैद्यकीय सेवा

वाडा - पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जैन संघटनेच्या श्रीमती सुरेखा अमृतलाल नहार यांच्या वतीने एक विशेष उपक्रम सुरू केला आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून परिसरात डॉक्टर

वाडा – पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जैन संघटनेच्या श्रीमती सुरेखा अमृतलाल नहार यांच्या वतीने एक विशेष उपक्रम सुरू केला आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून परिसरात डॉक्टर आपल्या दारी ही संकल्पना राबवत मोबाईल व्हॅन दवाखाना सुरू केला आहे. ही व्हॅन डहाणू परिसरात फिरून आपली विनामूल्य वैद्यकीय सेवा विनामूल्य पुरविणार आहे. या वेळी डहाणू विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद निकोले,प्रांताधिकारी सौरभ कटियार,तहसीलदार राहुल सारंग, नगराध्यक्ष भरत राजपूत व इतर मान्यवर उपस्थित होते.