पाटीदार इमारतीतील मनपाच्या मोफत कोवीड रूग्णालयातील रूग्णांना डॉक्टर, नर्स  बांधणार राख्या

कल्याण :  कल्याण डोबिंवली मनपाच्या माध्यमातून सोनारपाडा डोबिंवली येथे प्रशस्त व सुसज्ज पाटीदार समाज इमारतीमध्ये कोरोना रूग्णांसाठी २०० आँक्सिजन बेड  तसेच  १०आयसीयू बेड सुविधेसह  कोरोना सेंटर उभे करून कोवीड रुग्णांवर मोफत उपचार सुरु आहेत.  उद्या रक्षाबंधनानिमित्त येथील कोविडवर उपचार घेणाऱ्या रूग्णांना रूग्ण सेवा देणारे  वनरुपी  क्लिनिकच्या महिला डॉक्टर, नर्स  राख्या बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे करणार आहेत.                     

रुग्णांचे मनोबल वाढण्यासाठी  या राख्या बांधणार असल्याचे येथील डॉक्टर नर्स यांनी सांगितले. या निमित्ताने रूग्णांकडून कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी सोशल डिस्टंन्सिंग, नियमीत मास्क , सॅनिटाइझर  आदिचा वापर करण्याबाबत शपथ घेतली जाणार आहे.  हे रुग्ण कोरोना आजारातून बरे होऊन घरी गेल्यानंतर सामाजिक बांधलिकीच्या जाणिवेतून  लोकांंमध्ये घेतलेल्या शपथेप्रमाणेच जनजागृती करण्याचे वचन  या रक्षाबंधन निमित्ताने घेतले जाणार असल्याचे वनरुपी क्लिनकचे मुख्य  डॉ. राहुल घुले यांनी सांगितले.