डॉक्टरांना मारहाण प्रकरणी निषेध व कारवाई म्हणून डॉक्टर काळ्या फिती लावून काम करणार

वाडा - उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्या प्रकरण उघडकीस आले आहे. वाडा पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. पालघर

 वाडा – उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांना  मारहाण केल्या प्रकरण उघडकीस आले आहे. वाडा पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा ग्रामीण रुग्णालयात २८ एप्रिल सायंकाळी ४.३० च्या सुमारास वाडा तालुक्यातील एका गावातील रुग्णाला उपचारासाठी त्याच्या आई व भावाने दाखल केले. रुग्णाला अशक्तपणा आहे असे रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना सांगून उपचार करायला सांगितले. यावर डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले  तुम्ही तुमच्या रुग्णाचे ओपीडी मधून केस पेपर काढून घ्या असे डॉक्टरांनी सांगितले. 

पण नातेवाईकांकडून तुम्ही त्याला सलाईन लावा असा आग्रह धरण्यात आला.  यावर डॉक्टर आणि रुग्णाच्या नातेवाईकात वाद झाला. रुग्णाच्या नातेवाईकांनी तेथील वैद्कीय अधिकारी व प्रशिक्षीत दोन डॉक्टरांना ही मारहाण करण्यात आली. असा आरोप करून तेथील वैधकिय अधिकारी अतुल शिराळ यांनी वाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. वाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे .तर एक आरोपी ताब्यात असून पुढील तपास चालू आहे.
तर या घटनेचा निषेध करीत आरोपींना कडक शासन व्हावे. उद्या डॉक्टर कर्मचारी वर्ग काल्या फिती लावून निषेध करणार असल्याची माहिती मारहाण करण्यात आलेले डॉक्टर अतुल शिराळ यांनी फोनवरून माहिती दिली.
प्रतिक्रिया
डॉक्टरांना झालेल्या या घटनेचा तीव्र निषेध करीत आहोत. व कोरोना साथ नियंत्रण मध्ये नवीन कायदे लागू आहेत त्या नुसार नवीन कायद्याप्रमाणे कारवाई करा अशी आमची मागणी आहे
 आरोपीवर कारवाई करण्यात यावी यासाठी पालघर जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांना याबाबत  पालघर जिल्हा वैधकीय अधिकारी संघटनेच्या वतीने  निवदेन सादर करणार असल्याचे संघटनेचे सचिव  संजय बुरपल्ले यांनी बोलताना सांगितले. तर रुग्णाच्या नातेवाईकानी या प्रकरणाबाबत डॉक्टर विरोधात तक्रार दिली असल्याचे सांगितले जाते.