dombivali building collapsed

डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रोडवर असलेल्या एका जुन्या इमारतीचा काही भाग आज कोसळल्याची घटना घडली आहे.(building collapsed in dombivali) सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.२ महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत.

कल्याण- डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रोडवर असलेल्या एका जुन्या इमारतीचा काही भाग आज कोसळल्याची घटना घडली आहे.(building collapsed in dombivali) सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.२ महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत.

महात्मा फुले रोडवर महेश भुवन ही जुनी इमारत आहे. ही इमारत तळमजला अधिक तीन मजली अशी आहे. ही इमारत ४० वर्ष जुनी होती . आज दुपारी या इमारतीचा काही भाग रस्त्यावर कोसळला. यामध्ये दोन वाहनाचे नुकसान झाले आहे. या इमारतीत कोणीही राहत नसल्याने जीवितहानी झाली नाही.

या इमारतीत सात व्यवासायिक गाळे आहेत. हे गाळे चालू असले तरी आता रिकामे करण्याचे काम सुरू आहे. इमारतीचा काही भाग कोसळल्यानंतर कडोंमपा प्रशासनातर्फे फायर व पोलीस यांच्या उपस्थिती ही इमारत जमीनदोस्त करण्याचे काम सुरू असल्याची माहिती ह प्रभाग अधिकारी भारत पवार यांनी दिली.

पालिकेच्या ह प्रभाग क्षेत्र कार्यालयाकडून इमारतीचे मालक महेश राऊत यांना इमारत अतिधोकादायक असल्याची नोटीस बजावली होती. आज या इमारतीचा सज्ज अचानक कोसळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुचाकीवरील दोन महिला किरकोळ जखमी झाल्या. तर तळमजल्यावर महावीर पेपर मार्ट, महावितरण अधिकृत वीजबिल भरणा केंद्र आणि दुकान होते. घटना घडल्यावर घटनास्थळी पथकप्रमुख विजय देशमुख यासह अनेक कर्मचारी वर्ग आणि विष्णूनगर पोलीस दाखल झाले. या इमारतीतील एक गाळा राजाराम यादव यांनी पागडीवर घेतला होता. इमारत जमीनदोस्त करण्याआगोदर पालिका प्रशासनाकडून लेखी आश्वासन दिल्याशिवाय गाळा रिकामा करणार नाही आशी भूमिका मीना यादव यांनी घेतली. काही ववेळाने प्रशासनाने त्यांची समजूत काढत तुम्हाला न्याय मिळेल असे आश्वासन दिले. त्यानंतर यादव कुटुंबीयांनी गाळा रिकामा केला. यानिमित्ताने मनपा क्षेत्रातील धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पालिका हद्दीतील धोकादायक इमारती

अ प्रभाग क्षेत्र – धोकादायक इमारत ४ ( राहणाऱ्या कुटुंबांची संख्या ५ )

ब प्रभाग – धोकादायक इमारत ११ ( राहणाऱ्या कुटुंबांची संख्या १२६ )

क – धोकादायक इमारत ५४ ( राहणाऱ्या कुटुंबांची संख्या ३२२ )

जे – धोकादायक इमारत ३२ ( राहणाऱ्या कुटुंबांची संख्या २८५ )

ड- धोकादायक इमारत १ ( राहणाऱ्या कुटुंबांची संख्या ८ )

फ- धोकादायक इमारत १४४ ( राहणाऱ्या कुटुंबांची संख्या २०१६)

ह – धोकादायक इमारत २५ ( राहणाऱ्या कुटुंबांची संख्या २९२ )

ग – धोकादायक इमारत ८ ( राहणाऱ्या कुटुंबांची संख्या २४४ )

आय – धोकादायक इमारत ० ( राहणाऱ्या कुटुंबांची संख्या ०)

इ – धोकादायक इमारत ५ ( राहणाऱ्या कुटुंबांची संख्या ० )

एकूण – धोकादायक इमारत २८४ – कुटुंबांची संख्या ३२९८

 

पालिका हद्दीतील अतिधोकादायक इमारती

अ प्रभाग क्षेत्र – अतिधोकादायक इमारत २ ( राहणाऱ्या कुटुंबांची संख्या ३ )

ब प्रभाग – अतिधोकादायक इमारत १० ( राहणाऱ्या कुटुंबांची संख्या ११२ )

क – अतिधोकादायक इमारत १०२ ( राहणाऱ्या कुटुंबांची संख्या ११२७ )

जे – अतिधोकादायक इमारत २ ( राहणाऱ्या कुटुंबांची संख्या ० )

ड – अतिधोकादायक इमारत ६ ( राहणाऱ्या कुटुंबांची संख्या ६१ )

फ – अतिधोकादायक इमारत १६ ( राहणाऱ्या कुटुंबांची संख्या २२४ )

ह – अतिधोकादायक इमारत १५ ( राहणाऱ्या कुटुंबांची संख्या २८३ )

ग – अतिधोकादायक इमारत ३२ ( राहणाऱ्या कुटुंबांची संख्या २५३ )

आय – अतिधोकादायक इमारत ० ( राहणाऱ्या कुटुंबांची संख्या ० )

इ – अतिधोकादायक इमारत २ ( राहणाऱ्या कुटुंबांची संख्या १०७ )

एकूण अतिधोकादायक इमारत १८७ – कुटुंबांची संख्या २१७०