राज्य सरकारविरोधात डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांचे सहपरिवार आंदोलन

डोंबिवली : राज्य सरकार विरोधात भाजपने आज राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली असून डोंबिवलीतील भाजप आमदार आणि माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सहपरिवार आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले. भाजपने

 डोंबिवली : राज्य सरकार विरोधात भाजपने आज राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली असून डोंबिवलीतील भाजप आमदार आणि माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सहपरिवार आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले. भाजपने राज्य सरकारविरोधात आज राज्यात सर्वत्र आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. ‘आंगण ते रणांगण’ या शिर्षकाखाली राज्यातील अनेक भाजपा नेते आणि कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात कोरोना संक्रमितांची वाढती संख्या, आरोग्य व्यवस्थेचा उडलेला बोजावारा, कापूस उचल, आंबा आणि काजू उत्पादकांना योग्य तो दर दिला जावा आदी अनेक मुद्द्यांचे मजकूर असलेले फलक हातात घेवून रविंद्र चव्हाणांनी सहपरिवार आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले.