पहाटेपासून लावतात डोंबिवलीकर बससाठी रांगा – राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात नागरिकांनी मांडल्या व्यथा

डोंबिवली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या स्थापना दिनानिमित्त डोंबिवलीत राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सुधीर वंडार पाटील यांनी डोंबिवलीकरांसाठी त्यांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षित

डोंबिवली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या स्थापना दिनानिमित्त डोंबिवलीत राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सुधीर वंडार पाटील यांनी डोंबिवलीकरांसाठी त्यांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी सॅनिटाईझर वाटपाचा कार्यक्रम बुधवारी सकाळी इंदिरा गांधी चौकात आयोजित केला होता. यावेळी सध्याच्या वाहतूक परिस्थितिची माहिती देताना प्रवासी नागरिकांनी सांगितले की, पहाटे साडे पाच वाजल्यापासून येथे नागरिक रांगेत उभे होते ते बघून सुधीर पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधला.

नागरिकांनी सुधीर पाटील यांना सांगितले की आम्ही पहाटे तीनला उठतो, साधारण साडे पाच वाजल्यापासून रांग लावतो. रांग लावल्यानंतर देखील आम्हाला आठ वाजेपर्यंत म्हणजे अडीच तास बस मिळत नाही. आणि बस मिळाल्यानंतर वाहतूक कोंडीमध्ये आम्ही अडकतो.  वाहतूक कोंडीतून जर का मार्ग मिळाला तर आम्ही कामावर पोहचतो. पुन्हा परतीच्या प्रवासाचे आमच्यावर दडपण असते. अशा प्रकारचे सर्व गाऱ्हाणे नागरीकांनी सुधीर पाटील यांच्या पुढे मांडले. यावेळी सुधीर पाटील यांनी तातडीने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तसेच राज्य परिवहनला पत्र देऊन राज्य शासनाला पत्र देऊन जास्तीत जास्त बसेस डोंबिवली येथून सोडाव्यात ,अशी मागणी राष्ट्रवादी युवक तर्फे करण्यात येणार असल्याचे सांगितले.