डोंबिवली रेल्वे पुलाचे ८ गर्डर बसवण्याचे काम ४ तासांमध्ये पूर्ण

डोंबिवली : कोरोनामुळे रेल्वे सेवा बंद आहे त्याचा फायदा घेत कोपर पूल तोडण्याचे काम सुरू करण्यात आले व आज कल्याण दिशेकडील पादचारी उड्डाणपुलावर ८ गर्डर बसवण्याचे काम ४ तासांमध्ये पूर्ण करण्यात

 डोंबिवली : कोरोनामुळे रेल्वे सेवा बंद आहे त्याचा फायदा घेत कोपर पूल तोडण्याचे काम सुरू करण्यात आले व आज कल्याण दिशेकडील पादचारी उड्डाणपुलावर
८ गर्डर बसवण्याचे काम ४ तासांमध्ये पूर्ण करण्यात आले. डोंबिवली रेल्वे स्थानकातील पूल ४० वर्षांपूर्वीचा असून धोकादायक झाल्याने पाडून टाकण्यात आला. मात्र नवा पूल बांधण्यासाठी रेल्वेकडून मेगा ब्लॉक मिळत नसल्याने काम रखडले होते. हा ४ मीटर रुंद असलेला पूल वाढत्या गर्दीमुळे अपुरा ठरत होता. यामुळे पुलाची रुंदी ९ मीटर व लांबी सुमारे ७० मीटर करण्यात येणार आहे 

रेल्वे प्रशासनाने गर्डर तयार ठेवले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज गर्डर बसविण्याच्या कामाला मंजुरी दिली. त्याप्रमाणे आज सकाळपासून जोरदार तयारी सुरू करण्यात आली. एकूण ८ गर्डर बसवण्यासाठी सुमारे ५० ते ६० कर्मचारी, २५० टन वजनाच्या २ क्रेन व ४ ट्रेलर सज्ज होते. साधारण १०.३०-११ वाजता गर्डर बसवण्यास प्रारंभ झाला व २ वाजता आठही गर्डर बसवण्याचे काम विक्रमी वेळात पूर्ण झाले. आता उर्वरित काम तातडीने करून प्रवाशासाठी पूल खुला करून दिला जाईल, असे रेल्वे अधिकाऱ्याने नाव न देण्याच्या अटीवर सांगितले.