कारखाने बंद केल्याने मशिनरी सडू लागली, औद्योगिक सुरक्षा विभागाची आडमुठी भूमिका

डोंबिवली : राज्यातील उद्योगचक्र पूर्वपदावर येत असून हजारो नव्या उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र डोंबिवलीत उलटे चक्र फिरू लागले आहे. उद्योगचक्र पूर्वपदावर आणण्यात सरकारी बाबूंचा खोडा

 डोंबिवली : राज्यातील उद्योगचक्र पूर्वपदावर येत असून हजारो नव्या उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र डोंबिवलीत उलटे चक्र फिरू लागले आहे. उद्योगचक्र पूर्वपदावर आणण्यात सरकारी बाबूंचा खोडा घातल्याचे दिसून येते. एकीकडे डोंबिवलीच्या औद्योगिक विभागातील २० कारखान्यांना कारणे दाखवा, तसेच बंद करा अशा नोटिसा बजावण्यात आल्या आहे,प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही अटींवर परवानगी दिली असली तरी कल्याण औद्योगिक सुरक्षा विभागाने अडवणुकीची भूमिका घेतल्याने कारखान्यातील मशिनरी खराब होण्याची भीती आहे.

कल्याणच्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य कार्यालय आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने जवळपास २० कारखान्यांना नोटीसा बजावून त्रुटी दूर करेपर्यंत बंदचा बडगा उभारला आहे. अनेक कंपन्यांनी त्रुटी दूर केल्याचा अहवाल देऊनही त्यांना कंपनी सुरू करण्यास परवानगी देत नाही. राज्य सरकारने कारखाने सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर डोंबिवलीत काही कारखाने सुरू झाले मात्र काही कारखाने सुरू करण्याची तयारी असताना औद्योगिक सुरक्षा विभाग परवानगी देण्यास तयार नाही बरेच महिने कारखाने बंद असल्याने मशिनरी खराब होऊ लागली आहे तर अनेक मोठ्या कंपन्यांना कच्चा माल बंद कंपन्या करतात पण त्याच बंद केल्याने उत्पादन बंद झाल्याने मोठे आर्थिक नुकसान होत आहे सुरक्षाविभागाला ज्या त्रुटी आहे त्याची जी पूर्तता हवी ती करण्यास तयार आहे अनेक कंपन्यांनी तसे लेखी कळवलं पण सुरक्षा कार्यालय निर्णय घेत नसल्याने उद्योजक मेटाकुटीला आले आहे. या संदर्भात कल्याणच्या ओद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे फॅक्टरी
इन्स्पेक्टर विनायक लोंढे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, प्रदूषण मंडळाने जर परवानगी दिली असेल तर ती प्रदूषणासंदर्भात आहे. कंपनीतील सुरक्षेसंदर्भात जे नियम आहेत त्याची पूर्तता केल्याचा अहवाल कंपन्यांनी दिला नाही. तो अहवाल आल्यानंतर कंपनी सुरु करण्यास परवानगी दिली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.