savitribai phule thetre dombivali

कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊन(lock down) शिथिलता नियमांचे पालन करीत कल्याण डोंबिवली(kalyan dombivali) पालिकेने आचार्य अत्रे रंगमंदिर सुरू करीत नाट्य रसिक प्रेक्षकांना दिलासा दिला. त्या पाठोपाठ गेल्या ९ महिन्यापासून बंद असलेले डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृह(savitribai phule drama theater) २० डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

कल्याण: कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊन(lock down) शिथिलता नियमांचे पालन करीत कल्याण डोंबिवली(kalyan dombivali) पालिकेने आचार्य अत्रे रंगमंदिर सुरू करीत नाट्य रसिक प्रेक्षकांना दिलासा दिला. त्या पाठोपाठ गेल्या ९ महिन्यापासून बंद असलेले डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृह(savitribai phule drama theater) २० डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट घोंगावत असल्यामुळे गेले नऊ महिने नाट्यगृहदेखील बंद करण्यात आले होते. मात्र हळूहळू सर्वच गोष्टी सुरळीत होत असून डोंबिवलीसारख्या सांस्कृतिक नगरीत असणारे सावित्रीबाई फुले नाट्यगृहात पुन्हा तिसरी घंटा वाजणार आहे.

या नाट्यगृहात डोंबिवलीतील कलाकार संगीत नाटक सादर करणार असून ‘दोन लग्नाची एक गोष्ट’ असे या संगीत नाटकाचे नाव आहे.तर या नाटकाचे निर्माते किशोर मानकामे आणि डोंबिवलीत राहणारे शैलेश प्रभावळकर आणि कलाकार डोंबिवलीतील रहिवाशी आहेत. या नाटकाच्या पहिला प्रयोगाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, डोंबिवली पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर जाधव, सचिव नरेंद्र थोरावडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर २७ तारखेला प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनचे ‘तू म्हणशील तस’ हे नाटक सादर होणार आहे. एकंदरीतच सांस्कृतिक शहराला टाळेबंदीमुळे आलेली मरगळ लवकरच दूर होणार असल्याचे पहावयास मिळत आहे.