डोंबिवलीत वरद विनायक एजन्सीला शॉर्ट सर्किटमुळे आग

डोंबिवली : येथील औद्योगिक विभागातील फेज २ मधील वरद विनायक एजन्सीला सकाळी ९ च्या सुमारास अचानक आग लागली. मात्र सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही. अग्निशमन दलाचे जवान तातडीने दाखल झाले व त्यांनी

 डोंबिवली : येथील औद्योगिक विभागातील फेज २ मधील वरद विनायक एजन्सीला सकाळी ९ च्या सुमारास अचानक आग लागली. मात्र सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही. अग्निशमन दलाचे जवान तातडीने दाखल झाले व त्यांनी आग नियंत्रणात आणली. डोंबिवली औद्योगिक विभागातील फेज २ मध्ये सांगाव येथे ही एजन्सी असून पार्ले बिस्कीट व चॉकलेट याची ही एजन्सी आहे. तेथील गोदामात मोठ्या प्रमाणात माल होता. आतील कार्यालयातूंन सकाळी ९ च्या सुमारास धूर येऊ लागला. यामुळे जे कर्मचारी होते ते घाबरून बाहेर आले. तातडीने मानपाडा पोलीस अग्निशमन दलाच्या गाड्या ,कामा संघटनेचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सर्वांनी आग नियंत्रणात आणली. आगीचे कारण समजू शकले नाही. मात्र यात कोणी जखमी पण झाले नाही, अशी माहिती कामाचे सदस्य श्रीकांत जोशी यांनी दिली.