Dombivli The rickshaw puller KDMC buses rushed to the aid of the passengers

परिवहनच्या या सोईमुळे मजोर रिक्षाचालकांना चाप बसला आहे. कल्याण ते डोंबिवली प्रवासासाठी २५० ते ३०० रुपयांची मागणी करून रिक्षा चालक प्रवाशांची लुट करत होते. कल्याणसाठी ५० रुपये शेअरप्रमाणे रिक्षा नेहमी धावत असल्या तरी आज मात्र काही चालाकांनी २०० रुपये घेऊन प्रवाशांना लुबाडले असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात आले.

डोंबिवली : कल्याण पत्रीपुलाच्या गर्डर कामासाठी रेल्वेने ठराविक वेळेसाठी शनिवार-रविवार दोन दिवसाचा मेगाब्लॉक घेतला आहे. याचा फायदा घेत प्रवाशांना लुटणाऱ्या रिक्षा चालकांच्या मनमानी कारभाराला कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेने ब्रेक लावलाय.  KDMC च्या बसेस प्रवाशांच्या मदतीला धावून आल्या असेच म्हणावे लागेल.

मेगाब्लॉकमुळे डोंबिवलीतील अत्यावश्यक कर्मचारी तसेच महिलांसाठी  रेल्वे प्रवासाची समस्या निर्माण झाली. परिणामी डोंबिवलीहून कल्याण, विठ्ठलवाडी, बदलापूर, टिटवाळा, उल्हासनगर, अंबरनाथ येथे जाणाऱ्या नागरिकांसाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था म्हणून परिवहनने जादा बसेस सोडल्या आहेत. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रम अंतर्गत कल्याण आणि डोंबिवली बस स्थानकामधून विशेष जादा बस सोडण्यात आल्या आहेत. परिवहन सभापती मनोज चौधरी यांच्यासह आगर व्यवस्थापक संदीप भोसले आणि परिवहन सदस्यांनी डोंबिवली स्थानकात भेट देऊन जादा बस उपक्रम व्यवस्थेची पाहणी केली.

डोंबिवली बस स्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. प्रत्येक दहा मिनिटाच्या अंतराने कल्याणसाठी बस व्यवस्था केल्याने प्रवाशांची गर्दी आटोक्यात आली. मात्र, प्रवासा दरम्यान सोशल डिस्टेनसिंगचे भान प्रवाशांनी राखले नाही. यावेळी सभापती मनोज चौधरी यांनी सांगितले कि, डोंबिवली मार्गे कल्याण, विठ्ठलवाडी, बदलापूर, टिटवाळा, उल्हासनगर, अंबरनाथसाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन बस मधील अंतर १० मिनिटाचे असल्याने प्रवाशांची गर्दी नियंत्रणात आली. कल्याण डेपोमधूनच सर्व बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.

परिवहनच्या या सोईमुळे मजोर रिक्षाचालकांना चाप बसला आहे. कल्याण ते डोंबिवली प्रवासासाठी २५० ते ३०० रुपयांची मागणी करून रिक्षा चालक प्रवाशांची लुट करत होते. कल्याणसाठी ५० रुपये शेअरप्रमाणे रिक्षा नेहमी धावत असल्या तरी आज मात्र काही चालाकांनी २०० रुपये घेऊन प्रवाशांना लुबाडले असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात आले.