attack on kalyan worker

काही दिवसांपूर्वी कल्याण(kalyan) पश्चिमेकडील बारावे परिसरात महापालिकेचे सफाई काम करणाऱ्या ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांना स्थानिकांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. त्या पाठोपाठ पुन्हा एकदा पालिकेचे अमृत योजने अंतर्गत ड्रेनेजचे काम करणाऱ्या ठेकेदारांच्या कामगाराला लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना(beating by iron rod) घडली आहे.

कल्याण : काही दिवसांपूर्वी कल्याण(kalyan) पश्चिमेकडील बारावे परिसरात महापालिकेचे सफाई काम करणाऱ्या ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांना स्थानिकांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. त्या पाठोपाठ पुन्हा एकदा पालिकेचे अमृत योजने अंतर्गत ड्रेनेजचे काम करणाऱ्या ठेकेदारांच्या कामगाराला लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना(beating by iron rod) घडली आहे.

या प्रकरणी पालिकेचे कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ यांनी सतत घडणाऱ्या मारहाणीच्या घटनेमुळे कर्मचाऱ्याचे मानसिक खच्चीकरण होत असून विकासकामांवर याचा परिणाम होत आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी कठोर कारवाई करावी अशी मागणी पोलिसांकडे करत याबाबत तक्रार नोंदवली आहे.

कल्याण पश्चिम वाडेघर परिसरात महापालिकेचे अमृत योजनेअंतर्गत अंडर ग्राउंड ड्रेनेजचे काम सुरू आहे. आज काम सुरू असताना सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी चार ते पाच जण आले. आमच्या मालकीच्या जागेतून काम का करता असा जाब विचारत काम करत असलेल्या कर्मचाऱ्याला लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. मनोज नागर असे या जखमी कर्मचाऱ्याचे नाव असून त्याला उपचारासाठी रुक्मिणी बाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याआधी पण हे काम सुरू असताना सात ते आठ कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांकडून मारहाण करण्यात आली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून मारहाण करणाऱ्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ यांनी दिली.