कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावामुळे  जिल्हा परिषद कार्यालयातही प्रतिबंधात्मक  खबरदारी

ठाणे : कोरोना विषाणूंचा प्रसार ठाणे जिल्हा परिषदेच्या कोणत्याही कार्यालयांमध्ये होऊ नये. तसेच अधिकारी, कर्मचारी यांना संसर्ग होऊ नये म्हणुन विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी २० एप्रिल २०२० पासून शासनाने निर्गमित केलेल्या आदेशाचे काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व जिल्हा परिषद यंत्रणेला दिले आहेत. यासाठी विविध विभाग प्रमुखांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.

 ठाणे : कोरोना विषाणूंचा  प्रसार ठाणे जिल्हा परिषदेच्या कोणत्याही कार्यालयांमध्ये होऊ नये. तसेच  अधिकारी, कर्मचारी यांना  संसर्ग होऊ नये म्हणुन विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी  २० एप्रिल २०२० पासून शासनाने निर्गमित केलेल्या आदेशाचे काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश  सर्व जिल्हा परिषद यंत्रणेला दिले आहेत. यासाठी विविध विभाग प्रमुखांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. 

 
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिनांक २० एप्रिल २०२० पासुन शासकीय कार्यालयासाठी राज्य शासनाने मार्गदर्शक सुचनां सांगितल्या आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.  या संदर्भातील आदेश  सामान्य प्रशासन विभागाने काढले असल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी( प्रशासन) डी. वाय. जाधव यांनी दिली.
 
 सर्व विभागप्रमुख व कार्यालयप्रमुख यांच्या जबाबदाऱ्या  निश्चित-
सर्व  गट अ व ब अधिका-याची १००% उपस्थिती  अनिवार्य असणार आहे तर  कर्मचा-यांची  १०% उपस्थितीच असणार आहे. कार्यालयातील कर्मचा-यांच्या बैठक व्यवस्थेमधील प्रत्येकी  ६ फुटाचे अंतर आवश्यक ठेवण्यात येणार आहे. मोठया स्वरुपात कोणत्याही सभा घेता येणार नाही.  अत्यावश्यक कामाशिवाय कोणत्याही व्यक्तीस कार्यालयात प्रवेश बंद दिला जाणार नाही.  क्षेत्रियस्तरावरील अधिकारी , कर्मचा-यांची १००% उपस्थिती अनिवार्य असणार आहे. सर्व अधिकारी/कर्मचारी तसेच अत्यावश्यक अभ्यंगत यांना मास्क वापर करणे सक्तीचे करण्यात आले आहे. कार्यालय व परिसरात कोणलाही थुंकता येणार नाही. अधिकारी, कर्मचारी व अत्यावश्यक अभ्यंगत यांच्याकरीता प्रत्येक कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर 
 हॅन्ड सॅनिटाईज उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत. सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी आरोग्य सेतु ॲप डाऊनलोड करुन त्याचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जर महिला कर्मचा-यांचे लहान बाळ असल्यास (५ वर्षा आतील)  त्यांनी  घरुन काम करण्याची लेखी विनंती केल्यास तशी मुभा संबंधित विभाग प्रमुख यांनी द्यावी असे आदेश सोनवणे यांनी दिले आहेत.   
 
 
 निर्जंतुकीकरण व साफसफाई करण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता बांधकाम यांच्यावर तर  थर्मलस्क्रीनिग करण्याची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे-
 
जिल्हा परिषद मुख्यालय स्तरावरील अधिकारी कर्मचारी यांना थर्मल स्क्रीनिग व सॅनिटाईज करूनच कार्यालयात प्रवेश देण्यात येणार आहे.  तसेच शासकिय वाहने व अत्यावश्यक सेवेतील वाहने प्रवेशव्दारावर निर्जंतुकीकरण करणेत येणार आहेत.  जि.प.च्या सर्व कार्यालयातील अंतर्गत भाग दररोज निर्जतुकीकरण करून  जि.प.कार्यालया बाहेरील भाग  सार्वजनिक व-हांडा, जिना इत्यादी दररोज साफसफाई करण्यात येणार आहेत.वेळप्रसंगी अधिकारी कर्मचारी यांची गैरसोय होऊ नये म्हणून कोव्हिडं१९ आजराचे अधिकृत रुग्णालयाचे नाव  व पत्ता सर्व विभागांना उपलब्ध करुन दिला जाणार आहे.  तसेच अत्यावश्यक सेवा  नेहमीप्रमाणे सुरु राहणार असून अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-याची १००% उपस्थिती राहील. असे निर्देश सोनवणे यांनी दिले आहेत.