वंचित बहुजन आघाडीचे डोंबिवलीत डफली बजाव आंदोलन

एसटी सेवा बंद असल्याने कामगारांची उपासमारी होत आहे या बससेवा तात्काळ सुरू करण्यात याव्यात या प्रमुख मागणीसाठी पक्षप्रमुख ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार राज्यभरात "डफली बजाव आंदोलन करण्यात आल्याचे ठोके यांनी यावेळी सांगितले.

कल्याण :  वंचित बहुजन आघाडीचे डोंबिवली शहर अध्यक्ष सुरेंद्र ठोके यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात  डफली बजाव आंदोलन करण्यात आले. केंद्र व राज्य सरकार लॉकडाऊन उठवण्यास तयार नाही. या टाळीबंदीमुळे सर्व सामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. महाराष्ट्रातील एसटी सेवा व महानगरातील बससेवा खुल्या झाल्या पाहिजेत.

एसटी सेवा बंद असल्याने कामगारांची उपासमारी होत आहे या बससेवा तात्काळ सुरू करण्यात याव्यात या प्रमुख मागणीसाठी पक्षप्रमुख ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार राज्यभरात “डफली बजाव आंदोलन करण्यात आल्याचे ठोके यांनी यावेळी सांगितले. 

या आंदोलनात कल्याण डोंबिवली जिल्हा संघटक मिलिंद साळवे, ठाणे जिल्हा सचिव रेखाताई कुरवारे, भारतीय बौद्ध महासभा डों.अध्यक्ष गौतम सुतार, सम्यक विद्यार्थी आंदोलन ठा.जि.अध्यक्ष प्रतिक साबळे, उपाध्यक्ष  राजू काकडे,महासचिव  बाजीराव माने, सचिव नंदू पाईकराव, संघटक अर्जुन केदारे, वार्ड अध्यक्ष  विलास मोरे (इंदिरा नगर),उपाध्यक्ष  विजय इंगोले (इंदिरा नगर), महासचिव  संतोष खनदरे (इंदिरा नगर), प्रभारी महासचिव आनंद जावळे, संघटक अर्जुन केदारे, कार्यकर्ते -सुनिल पाचपुंजे, वार्डअध्यक्ष राहुल पांडवीर (आयरेगाव) रामकिसन हिंगे, योगेश सुतार, गणेश गायकवाड, रवी इंगोले, अशोक गायकवाड राजरत्न पांडवीर, निलेश कांबळे, राजू खरात आदी उपस्थित  होते.