E-Dedication of Covid Health Center in Thane by Chief Minister Uddhav Thackeray, State-of-the-art Covid Center with 306 beds

माझे कुटुंब-माझी जबाबदारी या न्यायाने आचरण ठेवले आणि शासनाच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन केल्यास कोरोनाची दुसरी लाट थोपविणे सहज शक्य आहे. यासाठी प्रत्येकाने खबरदारी घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

ठाणे : ठाणे महापालिका (TMC) क्षेत्रातील तसेच परिसरातील कोरोना बाधित (Corona Virus) नागरिकांना तातडीने औषधोपचार व वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी या दृष्टीकोनातून घोडबंदर परिसरातील बोरिवडे येथे ठाणे महानगरपालिका आणि झी इंटरटेन्टमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने अत्याधुनिक सुविधायुक्त उभारण्यात आलेल्या कोविड हेल्थ सेंटरचे व्हिडिओ (E-Dedication of Covid Health Center ) कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महापौर नरेश गणपत म्हस्के, स्थायी समिती सभापती संजय भोईर, महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा, नगरसेवक नरेश मणेरा, नगरसेवक सिद्धार्थ ओवळेंकर, अतिरिक्त आयुक्त(१) गणेश देखमुख यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.

संपूर्ण देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा कोरोना विरोधी लढ्यात सक्रीय आहे. प्रत्येक नागरिकाने माझे कुटुंब-माझी जबाबदारी या न्यायाने आचरण ठेवले आणि शासनाच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन केल्यास कोरोनाची दुसरी लाट थोपविणे सहज शक्य आहे. यासाठी प्रत्येकाने खबरदारी घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

E-Dedication of Covid Health Center in Thane by Chief Minister Uddhav Thackeray, State-of-the-art Covid Center with 306 beds

संपूर्ण प्रशासनाने घेतलेल्या मेहनतीला जनतेने दिलेल्या साथीमुळे, सहकार्यामुळे आपण कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेऊ शकलो. शासनाने जबाबदारी घेतली आहे. आपण फक्त खबरदारी पुढील काळात घेतल्यास करोना शुन्यावर आणणे शक्य असल्याचेही त्यांनी सांगितले

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात ठाणे जिल्ह्यात आरोग्य सुविधांची कमतरता होती. आपण युध्द पातळीवर जब्बो सुविधा निर्माण केल्यामुळे आज आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणावर आहेत असेही श्री ठाकरे यांनी सांगितले. दुसर्‍या लाटेसाठी आपण सज्ज आहोत. सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. नागरिकांना निरोगी सदृढ व चांगले आरोग्य मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. कोविड नंतर पोस्ट कोविड हा सतावणारा मुद्दा आहे. हे लक्षात घेऊन आपण त्या दृष्टीने प्रयत्न करीत आहोत. ठाणे मनपाने पोस्ट कोविड सेंटर सुरू करुन नागरिकांच्या मानसिक आरोग्यसाठी महत्व दिले आहे असे ही ठाकरे यांनी सांगितले.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले, कोरोना आपत्तीमध्ये राज्यशासनाने घेतलेल्या निर्णयांमुळे राज्यात मृत्यूदर कमी करण्यास यश मिळाले आहे. इतर राज्य देखिल महाराष्ट्र शासनाचे अनुकरण करतात. ठाणे जिल्ह्यात प्रभावीपणे आरोग्य यंत्रणा उभारण्यात आली आहे त्यामुळे एकही रुग्ण आरोग्य सुविधेपासुन वंचित राहणार नाही असेही श्री शिंदे यांनी सांगितले. ठाणे महापालिकेच्यावतीने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोव्हीड १९ चा सामना करण्यासाठी ज्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे त्या सर्व सुविधा अद्ययावत ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान कोरोना बाधित नागरिकांना तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी या दृष्टीकोनातून बोरिवडे येथील सर्व सुविधायुक्त कोव्हीड हेल्थ सेंटर महत्वाचे ठरणार आहे असेही त्यांनी सांगितले.

 E-Dedication of Covid Health Center in Thane by Chief Minister Uddhav Thackeray

मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत घोडबंदर परिसरात बोरिवडे येथील महापालिकेच्या मैदानात झी इंटरटेन्टमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडच्यावतीने दोन हँगर्सचा वापर करुन डेडिकेटेर कोव्हीड हेल्थ सेंटर उभारण्यात आले आहे. या ठिकाणी रुग्ण नोंदणी, तपासणी कक्ष, डॉक्टर्स नर्स लॉजस, व्यवस्थापन कक्ष, हाऊस किपिंग स्टोअर्स, फार्मसी स्टोअर, फुड स्टोअर, लिनन – क्लिन युटीलीटी, डोनींन -डॉफिंग रुम, डर्टि युटीलीटी, प्रसाधन गृहे इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी एकूण ३०६ बेडची सुविधा असून त्यापैकी २०८ ऑक्सिजन बेड, ९६ नॉन ऑक्सिलनेटेड व २ ट्राएज बेडचा समावेश आहे. सदर ठिकाणी सेंटर उभारणेसाठी आवश्यक ती स्थापत्य, पाणी पुरवठा व मल:निसारण व आरोग्य विभागाची सर्व कामे ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे.