ecobricks

टाकाऊपासून टिकाऊ(Best Out Of West) हे सत्यात उतरवून प्लॅस्टिकपासून इकोब्रिक्सचा प्रयोग(Ecobricks Project) नवी मुंबईत(Navi Mumbai) राबवण्यात आला आहे. या प्रयोगातून वाशीतील राजीव गांधी उद्यानात प्लॅस्टिक बॉटलपासून डॉग शेल्टर होम(Dog Sheter Home) तयार करण्यात आले आहे.

  सिद्धेश प्रधान, नवी मुंबई : नवी मुंबई (Navi Mumbai)हे आधुनिक शहर असले तरी पर्यावरणाचा समतोल(Environment Balance) साधण्यासाठी नवी मुंबई पालिका प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. एका बाजूला दूरवर पसरलेल्या एमआयडीसीमुळे नवी मुंबईतील वायू प्रदूषणात(Air Pollution) वाढ होत आहे. विकास व रोजगार महत्वाचा असल्याने हे उद्योगधंदे टिकणे आवश्यक आहेत. मात्र ते टिकवतना वायू प्रदूषणाला आळा घालण्याचे पालिकेसमोर आव्हान आहे. दुसरीकडे नवी मुंबई पालिकेने (NMMC)प्लॅस्टिक मुक्तीचा संदेश देत जनजागृतीस सुरुवात केली आहे. शहरातील अनेकांचा रोपे लावून पर्यावरण वाढवण्याकडे असतो. मात्र प्लॅस्टिक मुक्तीसाठी कार्य करणारे मात्र फार क्वचित सापडतात. नवी मुंबईत प्लॅस्टिक मुक्तीसाठी नवी मुंबईतील तरुणी सरसावल्या आहेत. त्यांनी उर्वरी ग्रुपची स्थापना करत प्लॅस्टिक मुक्तीचे अभियान राबवण्यास सुरुवात केली आहे.

  टाकाऊपासून टिकाऊ(Best Out Of West) हे सत्यात उतरवून प्लॅस्टिकपासून इकोब्रिक्सचा प्रयोग(Ecobricks Project) नवी मुंबईत(Navi Mumbai) राबवण्यात आला आहे. या प्रयोगातून वाशीतील राजीव गांधी उद्यानात प्लॅस्टिक बॉटलपासून डॉग शेल्टर होम(Dog Sheter Home) तयार करण्यात आले आहे.

  वसुंधरा गुप्ते व खुशी शाह या दोन कॉलेजवयीन मैत्रिणी. दोघींना पर्यावरणाची आवड. दरवर्षी झाडे लावून त्यांची जोपासना करत ते पर्यावरण प्रेम जपतात. मात्र याव्यतिरिक्त त्यांनी आता थेट प्लॅस्टिक मुक्तीसाठी पाऊल उचलले आहे. त्यानुसार त्यांनी ‘उर्वरी’ हा ग्रुप सुरू केला आहे.

  वसुंधरा सांगते की, मानवाने तयार केलेले प्लॅस्टिक हे पृथ्वीवरून समूळ नष्ट करणे अशक्य आहे. इतका प्लॅस्टिकचा वापर मानवी जीवनात केला जातो. प्लॅस्टिक मुक्तीसाठी काहीतरी करायचे आहे असे वाटायचे. त्यादरम्यान स्वीडन या युरोपमधील देशात प्रसिद्ध असलेल्या ‘इकोब्रिक्स’ हा प्रयोग नवी मुंबईत राबवण्यात आला आहे. यात १६० प्लॅस्टिक बोटल्सचा वापर करून डॉग शेल्टर होम तयार करण्यात आले आहे. यासाठी वसुंधरा गुप्तेचे इंजिनिअर असलेले वडील राजेश गुप्ते यांनी देखील त्यांना लोखंडी स्ट्रक्चर बनवण्यास मदत केली. प्लॅस्टिक बोटल्स, कागद व पिशव्यांपासून तयार केलेला हा प्रयोग पर्यावरणवाद्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. याकामी वसुंधरा गुप्ते व खुशी शाह यांना सिया गुप्ता, भविस्कर मेंडोंसा, ब्रॅण्डन जुडे, ओमकार शेणोय, शोल्क सिंग, श्रावणी जाधव या मित्रांची देखील साथ मिळत आहे.

  ecobricks experiment

  इकोब्रिक्स म्हणजे काय ?

  युरोपमधील स्वीडन देशात हा प्रयोग राबवला जात आहे.प्लॅस्टिक समूळ नष्ट होत नाही. ते जमिनीत गाडले तरी ते तसेच राहते. प्लॅस्टिक जाळले तर त्यातून वायू प्रदूषण होते. त्यामुळे हेच प्लॅस्टिक तसेच ठेवून इकोब्रिक्सच्या माध्यमातून पर्यावरणातून बाजूला सारले जाते.इकोब्रिक्स म्हणजे पर्यावरण पूरक विटा प्लॅस्टिक बॉटल्स गोळा केल्या जातात.आपल्या वापरात असलेले प्लॅस्टिकचे कागद किंवा वस्तू यांचे लहान तुकडे केले जातात.हे प्लॅस्टिक कागद किंवा तुकडे बाटलीत टाकले जातात.  दुधाच्या पिशव्या धुऊन व सुकवून त्या बाटलीत टाकल्या जातात. त्या एकावर एक मातींच्या विटांप्रमाणे रचून त्यापासून विविध वस्तू बनवण्यात येतात त्यास इकोब्रिक्स म्हणतात.

  अशाच प्रकारे  वाशीत डॉग शेल्टर होम तयार करण्यात आले आहे.इकोब्रिक्सपासून प्लॅस्टिक भिंत, स्टूल यासह अनेक गोष्टी बनवता येतात.प्लॅस्टिक वेचून डम्पिंग ग्राउंडवर साठले तरी ते तसेच राहते. प्रत्येक प्लॅस्टिक हे रिसायकल होत नाही. त्यामुळे इकोब्रिक्स प्रयोग उपयुक्त ठरतो. त्यामुळे पर्यवरणासाठी व प्राण्यांसाठी धोकादायक असलेले प्लॅस्टिक बॉटल्स व प्लॅस्टिक पिशव्या व कागद आपण इकोब्रिक्समध्ये बंदिस्त करून प्लॅस्टिकमुक्त परिसर करू शकतो.

  वसुंधरा गुप्ते सांगते की, २०२० साली जुलै महिन्यात खूप पाऊस पडला. त्यात त्यांना थंडीत कुडकुडत आडोशाला उभ्या असलेल्या पाळीव प्राण्यांचे हाल पहावले नाहीत. त्यासाठी आम्ही श्वानांसाठी काहीतरी करायचा विचार केला. जुलै महिना हा जागतिक प्लॅस्टिक मुक्त महिना म्हणून साजरा केला जातो. त्यानुसार प्लॅस्टिक मुक्तीचे ध्येय ठरवले. त्यातून इकोब्रिक्स या नाविन्यपूर्ण प्रयोगाबाबत माहिती मिळाली व आम्ही कामाला लागलो. त्यासाठी प्लॅस्टिक कागद गोळा केले. ते आम्ही विभागून प्रत्येकाच्या घरी ठेवले. दररोज अभ्यास व इतर ऍक्टिव्हिटी सांभाळून हा प्रयोग करत होतो. त्या प्लॅस्टिकचे तुकडे करून ते बॉटल्समध्ये भरून इकोब्रिक्स तयार केल्या. यापूढे विविध वस्तू तयार करण्याचा विचार आहे. यासाठी वर्कशॉप देखील आम्ही घेत आहोत. नवी मुंबई पालिकेने देखील हा प्रयोग राबवावा.