लॉकडाऊनमुळे कल्याणच्या ईदगाहवर शुकशुकाट

कल्याण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने आज रमजान ईदच्या दिवशीही कल्याणच्या ईदगाहवर शुकशुकाट पाहायला मिळाला. कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर असलेल्या ईदगाहवर आणि

 कल्याण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने आज रमजान ईदच्या दिवशीही कल्याणच्या ईदगाहवर शुकशुकाट पाहायला मिळाला. कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर असलेल्या ईदगाहवर आणि किल्ल्यासमोरील रस्त्यावर प्रत्येक ईदला हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव नमाज पठण करत असतात. मात्र यंदा लॉकडाऊनमुळे सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्याने यंदा रमजान ईदला याठिकाणी नमाज पठण करण्यात आले नाही. सर्व मुस्लिम बांधवानी घरातच नमाज पठण करून साधेपणाने ईद साजरी केली.

यंदा सरकारच्या आदेशानुसार मुस्लीम बांधवांनी ईद साधेपणाने साजरी करत जकात आणि इतर उर्वरित पैशांतून गोरगरिबांना मदत करण्यात आली असल्याचे मनसेचे राज्य सचिव इरफान शेख यांनी सांगितले. तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी दुर्गाडी किल्ला परिसर आणि संपूर्ण कल्याण शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली.