महापालिकेच्या कामांचा फटका महावितरण कंपनीला –  डोंबिवलीत बत्ती गुल

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेची गोग्रासवाडी परिसरात कामे सुरू असून त्यासाठी रस्ते खोदले जात आहेत. रस्ता खोदताना ठेकेदार योग्य काळजी घेत नाही. महावितरण कंपनीच्या उच्च दाबाच्या वीज

 डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेची गोग्रासवाडी परिसरात कामे सुरू असून त्यासाठी रस्ते खोदले जात आहेत. रस्ता खोदताना ठेकेदार योग्य काळजी घेत नाही. महावितरण कंपनीच्या उच्च दाबाच्या वीज वाहिन्या भूमिगत असून त्यावर खोदताना घाव बसल्याने वीज वाहिन्या तुटून वीज पुरवठा  खंडित होत आहे. गोग्रासवाडी भागात गुरुवारी सकाळी साधारण १० वाजल्यापासून वीज खंडित झाली आहे. सुमारे ५ तास वीज पुरवठा खंडित आहे. महापालिकेच्या कुचकामी कामामुळे त्याचा फटका महावितरण कंपनीला होत आहे अशी तक्रार महावितरण अधिकारी व्यक्त करीत आहेत.

गोग्रासवाडी, अंबिका नगर, नामदेव पथ, पाथर्ली आदी भागात सकाळी दहा साडेदहाच्या सुमारास वीज पुरवठा अचानक खंडित झाला. महावितरण विभागाने महापालिकेचे काम सुरू असताना नामदेव पथावरील रस्ता खोदण्याचे काम करत असताना मुख्यविज पुरवठा करणारी उच्च दाब वाहिनी तुटली व वीज पुरवठा खंडित झाला असे कळवले. दुपारी ३ – ४ पर्यंत वीज पुरवठा सुरू होईल असे कळवले.

गेले काही दिवस डोंबिवलीत पाऊस गायब असून यामुळे उकाड्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यातच वीज खंडित झाल्याने घरात थाबणे अवघड होतं आहे. याबाबत महावितरण अधिकाऱ्याने सांगितले की, कल्याण डोंबिवली महापासलिकेची कामे सुरू असून रस्ता खोदत असताना योग्य काळजी घेतली जास्त नाही. यामुळे भूमिगत वीज वाहिनी तुटते व वीज खंडित होते कल्याण डोंबिवलीत असेच प्रकार होत आहेत.  काम महापालिकेचे मात्र त्याचा त्रास महावितरण कंपनीला सहन करावा लागत आहे. 

डोंबिवली पूर्व भागात भूमिगत वीज वाहिन्या असून वीज खंडित झाली तर कुठे काय झालं हे शोधून काढण्यास वेळ लागतो. मात्र ओव्हर हेड केबल असेल तर लगेच समजत. पालिकेने ठेकेदाराला काम दिले असेल पण त्यावर देखरेख कुणीच ठेवत नाही. यामुळे अशा घटना घडतात असेही सांगितले दुपारी ३ वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरू झाला नव्हता.

याबाबत स्थानिक नागरिक येवलेकर म्हणाले की, संत नामदेव पथ, रॉकेल डेपो, अंबिका नगर, गोग्रासवाडी आसपास परिसरात ३ तासाहून अधिक काळ लाईट गेली आहे. लॉकडाउन काळात सतत लाईट जाते, स्थानिक प्रशासन लक्ष देइल का ?  तसेच लॉकडाउन आधी रॉकेल डेपो जवळील रोडवर केबल नेट वायरिंग पाणी पुरवठा विभाग सतत काम होत होती. मात्र रस्ता डांबरीकरण होत नाही. पावसाळ्यात वाढलेली झाडे तोडली आहेत तो कचराही लवकर उचलला जात नाही. यामुळे पावसात पाणी साचून डासांचा प्रादुर्भाव वाढतोय. कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, डोंबिवली गोग्रासवाडी भागात भूमिगत वीज वाहिनीत बिघाड झाला असून दुरुस्तीचे काम सुरू आहे.