आठ महिन्यांच्या चिमुरडीने केली कोरोनावर मात

भिवंडी: भिवंडीतील अंजुर फाटा ओसवाल वाडीच्या मागे राहत असलेल्या एका ८ महिन्याच्या चिमुरडीस कोरोना आजाराची लागण झाल्याने तिला इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले होते. मात्र या

भिवंडी: भिवंडीतील अंजुर फाटा ओसवाल वाडीच्या मागे राहत असलेल्या एका ८ महिन्याच्या चिमुरडीस कोरोना आजाराची लागण झाल्याने तिला इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले होते. मात्र या कोरोनाबाधित ८ महिन्याच्या मुलीने नऊ दिवसात या आजारावर मात केल्याने तिच्यावर फुलांचा वर्षाव करीत तिला व तिच्या आईला निरोप देण्यात आला. यावेळी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी सांगितले की, नागरिकांनी  पोलिसांना सहकार्य केल्यास आपण सर्वजण मिळून कोरोना या आजाराव मात करू. यावेळी पालिका आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर ,उपजिल्हा रुग्णालयाचे डॉथोरात, पालिकेचे डॉ जयवंत धुळे आदी उपस्थित होते