कल्याण डोंबिवलीच्या प्रभाग अधिकाऱ्याला कोरोनाची लागण – आज सर्वाधिक ८७ नवीन रुग्ण

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. केडीएमसी क्षेत्रात मागील २४ तासात सर्वाधिक तब्बल ८७ नवीन रुग्णांची भर पडली असून पाच जणांचा

 कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. केडीएमसी क्षेत्रात मागील २४ तासात सर्वाधिक तब्बल ८७  नवीन रुग्णांची भर पडली असून पाच जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.  आजच्या या ८७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची  संख्या  १७२६ झाली आहे. यापैकी आतापर्यंत ५५ जणांचा मृत्यू झाला असून ८७७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल ७९४ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

 
आजच्या रुग्णांमध्ये कल्याण पूर्वेतील १३, कल्याण पश्चिमेतील २२, डोंबिवली पूर्वेतील ३३,  डोंबिवली पश्चिमेतील १३ तर टिटवाळ्यातील ६ रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये ५२ पुरुष, २६ महिला, ७ मुलं तर २ मुली आहेत. आजच्या या रुग्णांमध्ये ५ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये कल्याण पश्चिमेतील पारनाका येथील ७९ वर्षीय पुरुष, टिटवाळा पश्चिमेतील ४५ वर्षीय पुरुष, डोंबिवली पूर्वेतील डी.एन.सी. रोड येथील ६५ वर्षीय पुरुष, मानपाडा रोड गावदेवी मंदिर येथील ५४ वर्षीय पुरुष आणि डोंबिवली पश्चिमेतील ठाकूरवाडी येथील ६० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.