भिवंडीतील रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – एकनाथ शिंदे

भिवंडी : भिवंडी शहर व ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून त्यासाठी भिवंडी महानगरपालिकेला निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी माहिती

 भिवंडी : भिवंडी शहर व ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून त्यासाठी भिवंडी महानगरपालिकेला निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भिवंडी येथे दिली आहे . ते भिवंडी महानगरपालिका मुख्यालयात आयोजित आढावा बैठकीसाठी उपस्थित होते . 

या बैठकीसाठी महापौर प्रतिभा पाटील, खासदार कपिल पाटील, आमदार रईस  शेख ,शांताराम मोरे ,जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर , स्विच सहाय्यक बालाजी खतगावकर ,माजी आमदार  रुपेश म्हात्रे , हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील ,उपमहापूर इम्रान खान , सभागृह नेते विलास पाटील , शिवसेना गटनेता संजय म्हात्रे , आयुक्त डॉ पंकज आशिया, उपविभागीय अधिकारी डॉ मोहन नळदकर , पोलीस उपायुक्त  राजकुमार शिंदे, तहसीलदार शशिकांत गायकवाड, गटविकास अधिकारी डॉ प्रदीप घोरपडे , महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. जयवंत धुळे यांसह अधिकारी उपस्थित होते . 

या बैठकी दरम्यान तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या, वाढलेला मृत्यूदर याबाबत काही जणांनी चिंता व्यक्त करीत कोरोना बाधितांना योग्य आरोग्य सुविधा मिळत नसल्याचा सूर लावला असता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोना व त्या व्यतिरिक्त इतर रुग्णांसाठी आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन स्तरावर रुग्णालय उपलब्ध करून देण्याचे आदेश प्रशासनास दिले असून शहरातील खाजगी रुग्णालय जर उपचार करण्यास तयार नसतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांना दिले असून , पोगाव या ठिकाणी तात्पुरते रुग्णालय उभारण्यास महानगरपालिकेने तयार केलेल्या प्रस्तावावर विचार करून ते लवकरात लवकर कसे सुरु करता येईल या साठी सर्वोतोपरी मदत केली जाईल असे सांगितले . या बैठकीत कोरोना रुग्णांचे प्रमाण , लक्षणे नसलेले रुग्ण , स्क्रिनिंग करण्याचे प्रमाण वाढविणे, अधिकाधिक क्वारंटाईन सेंटर उभारणे , रुग्णवाहिका वाढविण्यासंदर्भात सूचना केल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी देत अजून २५ रुग्णवाहिका लवकरच उपलब्ध करून देत असल्याचे सांगत कोरोना विरोधातील लढ्यात सर्व समाजाचे योगदान गरजेचे असल्याचे स्पष्ट केले . या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी सर्व अधिकारी पदाधिकाऱ्यांसोबत पोगाव येथे बनविण्यात येणाऱ्या प्रस्तावित रुग्णालयास इमारतीस भेट देत तेथील इमारतीची व त्या ठिकाणी असणाऱ्या इतर साधनसामुग्रीची पाहणी केली .