मध्यमवर्गीयांचे वीजबिल आणि टेलिफोन बिल माफ करा

-भाजपा महिला शहराध्यक्ष पुष्पा रत्नपारखी यांची मागणी कल्याण : कोरोना या विषाणूने सर्व जगभर थैमान घातले व त्याचे पडसाद महाराष्ट्रात देखिल उमटले आहेत. सगळ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून व

-भाजपा महिला शहराध्यक्ष पुष्पा रत्नपारखी यांची मागणी

कल्याण : कोरोना या विषाणूने सर्व जगभर थैमान घातले व त्याचे पडसाद महाराष्ट्रात देखिल उमटले आहेत. सगळ्यांच्या सुरक्षिततेचा  विचार करून व कोरोना विषाणूला हरवण्यासाठि सरकारने लॉकडाऊन जाहिर केले. यामुळे नागरिकांवर मोठे आर्थिक संकट आले असून जे श्रीमंत आहेत त्यांनी  जीवनावश्यक वस्तूंचा साठा केला आहे. तर गरीब लोकांना सरकार मार्फत अन्नधान्य पुरविण्यात येत आहे. यात मात्र मध्यमवर्गीय लोकांचे हाल होत असून आगामी काळात आपल्या संसाराची आर्थिक घडी बसविताना त्यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. यावर उपाय म्हणून मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांचे वीजबिल आणि टेलिफोन बिल माफ करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या कल्याण शहर महिला अध्यक्षा पुष्पारत्न पारखी यांनी सरकारकडे केली आहे.

याबाबत त्यांनी भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्र पाठवले असुन महाराष्ट्रातील  मध्यमवर्गीय माणसाच्या आर्थिकस्थिति बद्दल विचार करत जनतेला न्याय देण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ,मध्यमवर्गीय कुटुंब वास्तव्यास आहेत. छोटे मोठे लघु उद्योग किंवा नोकऱ्या असा व्यवसाय करून ते  अपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. सध्या परिस्थितीत त्यांचे लघु उद्योग ठप्प झाले असून, जो कर्मचारी वर्ग घरात बसल्यामुळे काहींना अर्धा व काहींना तर अजिबातच नाही अशा स्वरूपात पगार मिळत आहे.

मध्यमवर्गीय माणूस सर्वसाधारणपणे आपले राहते घर कर्ज काढून घेत असतो व त्या कर्जाचे हप्ते पगारातुन काटकसर करून फेडत असतो. त्या सोबतच घराचे मेंटेनन्स ‘वीज बिल, किराणा, मुलांची फी, औषधे, भाजीपाला, असे एक ना अनेक खर्चांचे ओझे त्याच्या डोक्यावर असते. मध्यमवर्गीय या वर्गवारीत मोडणार्या व्यक्ती सुशिक्षित व कष्टकारी  असल्यामुळे सन्मानाने जगण्याकडे त्या्चा कल असतो. म्हणून त्यांच्या सन्मानाला ठेच पोहोचणार नाही व त्यांची थोडी मदत व्हावी यासाठी सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या विजखाते  व टेलीफोन खात्यां, मार्फत प्राप्त झालेले विजबिल व टेलिफोन बिल मध्यमवर्गियांना माफ करण्यात यावे अशी मागणी पुष्पा रत्नपारखी यांनी केली आहे.