कल्याणमध्ये विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण

कल्याण : महावितरण विभागाकडून पावसाळ्यापूर्वी केल्या जाणाऱ्या कामांना सुरवात झाली असून त्यामुळे अनेकदा वीज पुरवठा खंडित केला जात आहे. लॉकडाऊनमुळे घरात बसून वैतागलेले नागरिक विजेच्या लपंडावामुळे

कल्याण : महावितरण विभागाकडून पावसाळ्यापूर्वी केल्या जाणाऱ्या कामांना सुरवात झाली असून त्यामुळे अनेकदा वीज पुरवठा खंडित केला जात आहे. लॉकडाऊनमुळे घरात बसून वैतागलेले नागरिक विजेच्या लपंडावामुळे उकाड्याने हैराण झाले आहे. पावसाळ्यात वीज पुरवठा सुरळीत सुरु राहावा यासाठी महावितरणाकडून पावसाळ्यापूर्वीच्या कामाला सुरवात केली आहे. कल्याणातील काही भागात महावितरणकडून तीन तास वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेकदा विजेचा लपंडाव सुरूच होता. लॉकडाऊनमुळे घरात बसून कंटाळलेल्या नागरिकांना मे महिन्याच्या उकाड्याला सहान करावे लागत आहे. त्यातच आता विजेचा होत असलेल्या लपंडावामुळे नागरिक हैराण झाले आहे. महावितरणने पावसाळ्यापूर्वी आपले काम पूर्ण करावे. मात्र दुपारी आणि रात्रीच्या वेळेस वीज खंडित करू नये, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.