electricity

कल्याण : आज सकाळी अचानक वीजपुरवठयात खंड पडल्याने कल्याण डोंबिवली शहरात गोंधळ उडाला.(electricity supply issue inkalyan and dombivali) काही नागरिकांना वीज पुरावठ्याअभावी त्रास सहन करावा लागला. मात्र ऐन ऑक्टोबर हिटच्या वेळेत सहा तास नागरिकांना चांगलाच उकाडा सहन करावा लागला.

कल्याण : आज सकाळी अचानक वीजपुरवठयात खंड पडल्याने कल्याण डोंबिवली शहरात गोंधळ उडाला.(electricity supply issue inkalyan and dombivali) काही नागरिकांना वीज पुरावठ्याअभावी त्रास सहन करावा लागला. मात्र ऐन ऑक्टोबर हिटच्या वेळेत सहा तास नागरिकांना चांगलाच उकाडा सहन करावा लागला. तर काही हॉस्पिटलमध्ये जनरेटर बॅकअप मागवण्यात आल्याने कोणतीही हानी झाली नाही. दीड तास कल्याणहून मुंबई ला जाणाऱ्या लोकल ठाकुर्ली दरम्यान थांबल्या होत्या. त्यामुळे अत्यावश्यक सेवेसाठी जाणारे कर्मचारी कामावर पोहचू शकले नाही. तर दररोज ऑनलाइन सुरू असलेल्या विद्यार्थ्यांचे लेक्चर देखील होऊ शकले नाही.

केबी-२ फिडरवरून कल्याण पश्चिमेला वायलेनगर, पारनाका, दुर्गाडी, गांधारी रोड, आधारवाडी परिसरातील जवळपास ५० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला. तर केबी-१ फिडरवरून वीजपुरवठा होणाऱ्या कल्याण पूर्वेतील ९० फूट रोड, टाटा नेतीवली परिसरातील सुमारे १० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला.

कळवा पडघा जीआयएस (GIS) केंद्रातील तांत्रिक बिघाडामुळे कल्याण शहराला टाटा पॉवरकडून वीजपुरवठा होणारे केबी-१ व केबी-२ हे दोन फिडर सकाळी १० वाजून ५ मिनिटापासून बंद होती. १२ वाजेपर्यंत ३३ टक्के तर ३:३० पर्यंत ९० टक्के वीज पुरवठा सुरळीत झालाचे महावितरणकडून कळवण्यात आले आहे.